अवश्य वाचा


  • Share

संगमनेरातील गुटखा माफीयांवर कारवाई करावी अवैध धंद्याविरोधात शिवसेना आक्रमक

संगमनेर (प्रतिनिधी) राज्य सरकारने बंदी घालुनही संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटखा विक्रि होत आहे. प्रत्येक पानटपरी, चहा टपरी, तसेच किराणा दुकांनामध्ये गुटखा अढळून येत आहे. या अवैध गुटखा विक्रिला पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन जबाबदार असुन त्यांचेच या गुटखा माफियांशी अर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळे शासनाच्या हेतुला तसेच धोरणाला हारताळ फासला जात असुन प्रशासनाने शहरातील या गुटखा किंगवर कारवाई करून अवैध गुटखा विक्री बंद करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख अमर कतारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. भावी पिढी व्यासनाधीन होऊ नये, गुटखा सेवनामुळे कँन्सरचे प्रममाण प्रचंड वाढले आहे. कॅन्सरचा हा धोक्याला लक्षात घेऊन राज्यसरकारने आपल्या महसुलावर पाणी सोडत राज्यात गुटखा बंदी लागु केली. मात्र शहरात या कायद्याला वाटण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या असुन शहर व तालुक्यात सर्‍हास गुटखा विक्रि व त्याचे सेवन होताना अढळून येत आहे. गुटखा बंदी केवळ कागदावरच उरली असुन प्रशासनाच्या आशिर्वादाने खुलेआम गुटखा विक्रि होत आहे. शहरात एका आठवड्याला एक ट्रक गुूटखा खाली होतो. येथूनच इतर ठिकाणी माल पोहच केला जातो. गुटख्याच्या या गोरख धंदात एक मोठा व्यापारी कार्यरत असून त्याच्या वरिष्ठ पातळीवर हितसंबंध आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्रिस कायद्याने बंदी असतांनाही हा गुटखा या ठिकाणी सहज उपलब्ध होतो. त्यामुळे तरूणाई गुटख्यांची शौकीन झाली असुन सार्वजनिक ठिकाणी पिचकार्‍या मारून परिसर विदृप करीत आहे. शसाकीय कार्यालय परिसरातही या गुटख्यांची निशाणी अढळून येत आहे. कायद्यानुसार बंदीचा गैरफायदा घेत प्रचंड चढ्या भावाने गुटखा विक्रि करून संगमनेर गुटखा किंग गब्बर होत आहे. शहरात गुटखा किंग कोण आहे. याची पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाला पुर्ण माहित आहे. तरीही त्यांच्या माहितीसाठी शिवसेनेने या गुटखा किंगचे नाव व पत्ता तसेच त्याच्या गोदामांचे पत्ते प्रशासनाला लेखी दिले असुन आता प्रशासनाने या अवैध गुटखा विक्रिवर बंदी घालावी व गुटखा किंगवर कारवाई करावी अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख अमर कतारी, नगरसेवक लखन घोरपडे, अमोल कवडे, ज्ञानेश्‍वर कोटकर, पप्पु कानकाटे, रमेश काळे, सचिन साळवे, इमतीयाज शेख, कैलास कासार, संगीता गायकवाड आदिंनी दिला आहे.