अवश्य वाचा


  • Share

यशस्वी जीवन व करिअरसाठी कठोर परिश्रमांची गरज- धर्माधिकारी

संगमनेर ( प्रतिनिधी) प्रत्येकाने आपले गुण व आवड ओळखा. मन शांत व प्रसन्न ठेवा त्यातून एकाग्रता वाढेल. ही एकाग्रता यशाचा मार्ग ठरणार असून आपल्या यशस्वी जिवन व करिअरसाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असल्याचे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले आहे. मालपाणी लॉन्स येथे संग्राम नागरी पतसंस्था व जयहिंद करिअर अ‍ॅकेडमीच्या वतीने आयेजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ.सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, राणीप्रसाद मुंदंडा, नवनाथ अरगडे, अ‍ॅड. प्रशांत गुंजाळ, डॉ.माणिकराव शेवाळे, सुर्यकांत शिंदे , प्रियंका गडगे, विलास दिघे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अविनाश धर्माधिकारी म्हणाले कि, ग्रामीण भागात मोठी गुणवत्ता आहे. विद्यार्थ्यांनी स्वतामधील न्युनगंड दूर करा. स्वतामधील आवड व गुण ओळखा. या कामातून आनंद मिळतो तेच काम करा आणि त्याच कामात तज्ञ व्हा. यश मिळवण्यासाठी जिद्द व कठोर परिश्रमाची जोड द्या. सध्या पालक व विद्यार्थ्यांमध्ये करिअरबाबत अनेक संभ्रम निर्माण होत आहे. कुणाचे अनुकरण करु नका. यशस्वी व्यक्तींच्या जिवनातून प्रेरणा घ्या ही प्रेरणा तुम्हाला यश मिळवून देईल. बुद्धीमत्ता ही कुणाहीची मक्तेदारी नाही. बुद्धीने स्वतचा विकास साधा. मन शांत ठेवा त्याने एकाग्रता वाढेल आणि त्या एकाग्रतेतून तुम्हाला तुमच्या यशाकडे जाण्याचा मार्ग सोपा होईल. पुस्तकी ज्ञानाबरोबरच जगाच्या -ाानाचा उघडया डोळ्याांनी अभ्यास करा. पारंपारिक मार्ग सोडून खडतर मार्ग निवडा. त्याने तुम्हाला यश व किर्ती नक्की मिळेल. यावेळी तालुक्यातील प्रेरणादायी विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वांची उदाहरणेही त्यांनी दिली. आ.डॉ.तांबे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न उराशी बाळगा. यशस्वी व्यक्तींच्या जिवनकार्यातून प्रेरणा घ्या. तुम्हाला एखादया क्षेत्रात किर्तीवंत होण्याची ईच्छा निर्माण होईल तेव्हा हीच ईच्छाशक्ती तुम्हाला यश मिळवून देईल. विद्यार्थ्यांनी -ाान ग्रहज्ञानाची कायम भूक ठेवून ज्ञान आत्मसात केले पाहिजे. असेही ते म्हणाले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोहनराव देशमुख, निखील पापडेजा, संदीप खताळ, मॅनेंजर उमेश शिंदे, विलास कवडे, अवधूत आहेर आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत अ‍ॅड. प्रशांत गुंजाळ यांनी केले. प्रास्ताविक राणीप्रसाद मुंदडा यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.गणेश गुंजाळ व प्रा.नामदेव कहांडळ यांनी केले व सुर्यकांत शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.