अवश्य वाचा


  • Share

सुकेवाडी येथील महागणपती मंदिरात कलशरोहण व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथिल गणेश मंदिर कलशारोहणाचा व महादेव, हनुमान मुर्ती स्थापनेचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला असुन या कार्यक्रमास करवीर पिठाचे महंत नृसिंह भारती सरस्वामी महाराज उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विघ्नहर्ता लॉन्स मध्ये प.पु.महंत विद्यानृसिंह महाराज आशिर्वादपर प्रवचानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना त्यांनी सांगतले की, शास्त्राप्रमाणे गणपतीची उपासणा केल्यास चांगले फळ मिळते. कर्ज काढुन काही काही करू नका सढळ हाताने दान कारा, देवाचा कळस सन्याशाच्या हाताने बसवावा. देव ज्या प्रमाणे निर्गुण निरामय असेल त्या प्रमाणे सन्याशी असतो. प्रत्येकाचा धर्म शास्त्राप्रमाणे आकारण करावे, जिवनाचे कल्याण साधावे. भक्तीचे मोजमाप होत असते, काम, क्रोध लोभ माया, मत्सर हे विकार कमी होत असेल तर भक्ती मध्ये वाढ होत आहे. असे समजावे. भक्ताने भगवंताची भेट होई पर्यंत भक्तीत खंड पंडु देऊ नये. भक्तीत देवाची भेट झाल्यानंतर आत्यंतीक सुखाची प्राप्ती होते. यावेळी माजी महसुल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीरजी तांबे, जि.प.स.अजय फटांगरे, सिताराम राऊत, लक्ष्मणराव कुटे, सुभाष कुटे, गोरख कुटे, नवनाथ आरगडे, लहानुभाऊ गुंजाळ, बाजीराव पा.खेमनर, पो.नि.गोविंद ओमासे, सुलभाताई दिघे, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना.थोरात म्हणाले की, या वर्षी भरपुर पाऊस होऊ दे, संगमनेर तालुक्यात नेहमीच दुष्काळ असतो. भरपुर पाऊस झाल्यास भंडारदरा व निळवंडे बरोबर जाचकवाडीचाही प्रश्‍न मार्गी लागेल. शेतमालाला चांगला भाव मिळव्यास शेतकर्‍यांचे जिवन आनंदी होईल. यावेळी डॉ.तांबेचेही भाषण झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, विनोद बुब व विश्‍वस्त मंडळाने परिश्रम घेतले.