अवश्य वाचा


  • Share

संगमनेरात साथीच्या आजारात वाढ

संगमनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासुन बदललेल्या वातावरणामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक घरांमध्ये लहान मुलांना ताप, थंडी, यासारखे आजार वाढल्याने शहरातील हॉस्पिटल रूग्णांच्या संख्येने ओसांडुन वाहत आहे. या पार्श्‍वभुमिवर नगरपालिकेने डास निर्मुलनासाठी औषध फवारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासुन शहरामध्ये कधी पाऊस, तर कधी उन, थंडी असे बदल होत असल्याने त्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. शहरात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचुन व गटारी तुंबवून मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती झाली आहे. कचरा वेळेवर उचलल्या जात नसल्याने तसेच गटारी साफ नसल्याने मोठ्या प्रमणावर दुर्गंधी तसेच डासांंची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असुन रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात थंडी ताप या आजारा बरोबर डेंग्यु, मलेरियाचीही अनेकांना लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक प्रभागामध्ये घरोघरी अढळून येत आहे. या मध्ये लहान मुलांचे प्रमाण तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये प्रचंड संख्येने रूग्ण अ‍ॅडमीट असुन या साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहे. आचानक आलेल्या या हॉस्पिटलच्या खर्चाने अनेकांचे आर्थीक बजेट कोलमडले आहे. या साथीच्या आजाराचे भांडवल करून अनेक हॉस्पिटल चालक रूग्णांची आर्थिक पिळवणुकही करतांना दिसत आहे. त्यामुळे पालीकेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेऊन त्वरीत शहरातली सर्व प्रभागामध्ये औषध फवारणी सुरू करावी व साथीच्या आजारांना आळा घालून नागरिकांना दिलासा द्यावा आशी मागणी संगमनेरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.