अवश्य वाचा


  • Share

तीन जुलैपासून दंडकारण्य अभियानास प्रारंभ - आ.तांबे

संगमनेर (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची मुलभूत जबाबदारी बनली असून वृक्षारोपन व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढयांसाठी काळाची गरज बनली आहे. मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी दि.3 जूलै पासून तालुक्यात दंडकारण्य अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात आयोजित दंडकारण्य अभियानाच्या 12 व्या वर्षाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी बाजीराव पा. खेमनर, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, सभापती सौ. निशाताई कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, प्रभारी प्रांताधिकारी मनोज देशमुख, प्रभारी तहसिलदार प्रियंका आंबरे, अ‍ॅड. मधुकरराव गुंजाळ, प्रा.बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टीतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाची नोंद युनोने घेतली आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील अकरा वर्षात तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये, कार्यकर्ते नागरिकांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. तालुक्यात कमी पाऊस, जास्त उन्हाळा असून ही सहकारी संस्थांनी दिलेल्या भागामध्ये वृक्षसंवर्धनाचे चांगले काम केले आहे. शासनाने रायात 200 कोटी झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला असून या योजना लोकचळवळी बरोबर जोडल्याने त्या यशस्वी होणार आहे. इच्छा व प्रेरणा यामुळे पर्यावरण चळवळीत यश मिळत असून संगमनेर तालुका दुष्काळग्रस्त असूनही संपूर्ण तालुका हिरवा करण्याचा ध्यास प्रत्येक नागरिकांने घेतला पाहिजे. मागील 11 वर्षात या अभियानात सर्वांनी मोठा सहभाग घेवून लोकचळवळीच्या रुपाने काम केले आहे. यावर्षी 3 जूलै पासून हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये समन्वयक प्रा. बाबा खरात यांनी गावोगावी प्रचार व प्रसार आरंभ केला आहे. प्रचार, बिजारोपन, वृक्षारोपन अशा तीन टप्यात काम केले जाणार असून शासकीय विभाग व सहकारी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे 8 लाख वृक्षांचे रोपन करण्यात येणार आहे. तसेच या अभियानात काम करतांना चांगल्या जागा निवडून योग्य वृक्षांच्या रोपना बरोबर प्रत्येकाने आपल्या घराच्या परीसरात, अंजन, करंजी, कढीपत्ता, आवळा, जांभूळ, शेवगा, आंबा, चिंच, अशी बहुउपयोगी वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, जयहिंद लोकचळवळ व अमृत उद्योग समुह, तालुक्यातील विविध सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या वतीने यावर्षी गावातील सहकारी संस्था, शालेय विद्यार्थी यांच्या सहभागाने गावातील रिकाम्या जागी वृक्षारोपन करण्यात येणार आहे.यामध्ये सामाजिक वनीकरण व पंचायत समिती सहभागी होणार आहे. चंदनापुरी,कर्‍हे व माहुली घाटात विविध फुलांची बी पेरणी करण्यात येणार आहे. तसेच नाशिक पुणे महामार्गावर विविध शाळा व शैक्षणिक संस्थां, सहकारी संस्थांच्या समोर रस्त्याच्या दुतर्फा फुलांचे बीजारोपन करण्यात येणार आहे. यावेळी गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी. आर. भोसले, वनक्षेत्रपाल निलेश आखाडे, डि. एम. शिंदे, राहुल गायकवाड, आबासाहेब भोरे, नायब तहसिलदार मिलींद कुलथे, अमोल गंभीरे, बी.एल. गिते, बाळासाहेब फापाळे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब उंबरकर यांनी प्रास्ताविक केलेे. तर नामदेव कहांडळ यांनी आभार मानले.