अवश्य वाचा


  • Share

निळवंडे धरणातून पिण्यासाठी आवर्तन सुरू

अकोले (प्रतिनिधी) निळवंडे धरणातून आजपासून 1400 ते 1500 क्युसेकने पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनात 400 ते 500 दलघफू पाण्याचा वापर होणार आहे. पाच ते सहा दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून श्रीरामपूरपर्यंत पाणी पोहचल्यावर हे आर्वतन बंद केले जाणार असल्याची माहिती जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. निळवंडे धरणात काल रविवारी सायंकाळी 625 दलघफु पाणी साठा होता. भंडारदरा धरणात काल 2162 दलघफु पाण्याचा साठा होता. निळवंडे धरणातील 400 ते 500 दलघफु पाणी या आवर्तनात खर्च होणार आहे. अकोले शहर व परिसरात सुध्दा काल शनिवारी दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाच्या सरी बसरत आहेत. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासूनच प्रवरा परिसरातील इंदोरी-रूंभोडी-मेहेंदुरी परिसरात पावसास युरूवात झाली. रेडे, सुगाव खुर्द व बुद्रुक, कुंभेफळ, कळस खुर्द व बुद्रुक, परखतपूर परिसरात देखील दिवसभर पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. खरीप हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त आहे. पावसामुळे खोळंबून राहिलेल्या पेरण्या आता मार्गी लागतील.