अवश्य वाचा


  • Share

जिद्द, चिकाटी व कार्यतत्परतेतील सातत्य ठेवल्याने यश नक्की मिळेल - पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश

संगमनेर (प्रतिनिधी) एखाद्या कामाबद्दल असलेली ‘पॅशन’ व सकारात्मक ऊर्जा व्यक्तीला जीवनात यश प्राप्त करून देते. गुरूत्वाकर्षणापेक्षाही जास्त ऊर्जा आपल्यात निर्माण करून कष्टाची मर्यादा तोडता आली पाहिजे. उठा...जागे व्हा...व यश प्राप्त करा... तोपर्यंत थकू नका. प्रत्येक व्यक्ती एक अनमोल हिर्‍याप्रमाणें आहे स्वतःला घडवून जो पर्यंत आकार प्राप्त करून घेता येत नाही तो पर्यंत तो प्रकाशमान होणार नाही त्यासाठी सकारात्मक ऊर्जा स्वतः मध्ये निर्माण करण्याचे आवहान आय.जी.व्ही.आय.पी. कृष्णप्रकाश यांनी संगमनेर ग्रामिण मराठी पत्रकार संघ व सहयाद्री बहुजन संस्थेच्या वतीने सहयाद्री महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले. या प्रसंगी माजी महसूलमंत्री व आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुगाताई तांबे, पत्रकार संघाचे संस्थापक शकीलभाई शेख, विद्यमान अध्यक्ष रत्नाकर सातपुते उपस्थित होते प्रकल्पप्रमुख सुनिता कोडे, डॉ. कोडे उपस्थित होते. युवाशक्तीला योग्य दिशा दिली नाही तर ते विघातक मार्गाला वळू शकतात. युवकांना स्वतःच्या क्षमता ओळखता आल्या पाहिजे. जिद्द, चिकाटी व त्यातील सातत्य असेल तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. सकारात्मक ऊर्जा तुम्हाला साध्याकडे व यशाकडे घेवून जाते. तुमचे नशीब तुमच्या हातात आहे. त्यासाठी ध्येय निश्चित करा, कार्यतत्पर बना, आव्हान पेलण्याची शक्ती निर्माण करा त्याचबरोबर सामाजिक भावनिक बुद्धांक तुमच्यात असेल तर समाजाला तुम्ही योग्य दिशा देऊ शकता. कृतीतील सातत्य तुम्हाला यशाच्या जवळ घेवून जाते पण घाबरू नका तुमच्यातील प्रमाणिक कष्ट तुम्हाला यश प्राप्त करून देण्यास मदत करेल. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिका. हरीवंशराय बच्चन यांची कवितेतून’ कोशीस करणेवालों कि कभी हार नही होती’ असे उदगारत उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या भाषणातून आय.जी. कृष्णप्रकाश यांच्या कार्याचा गौरव केला. प्रशासनात अशा व्यक्ती शासन प्रणालीला शिस्त लावण्याचे काम करत असतात. सिंघम म्हणून उल्लेख करतांना त्यांनी अहमदनगर जिल्हयात केलेल्या कार्याबद्दल गौरव उदगार काढले. याप्रसंगी डॉ. कोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आ. बाळासाहेब थोरात यांनी स्वागत करून त्याच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजु शेख यांनी सूत्रसंचालन संदीप सातपुते यांनी तर आभार वसंत बंदावणे यांनी केले. योगेश रातडिया, रविंद्र बालोटे, अनिल शेळके, बाबा जाधव, गंगाधर शिंदे, दत्ता घोलप, किशोर सातपुते, आदीनाथ झुरले, संपादक किसन हासे, सलिम शेख, संजय साबळे, संजय पडवळ, चंद्रकांत महाले, पो.नि. गोविंद ओमासे, पो.नि. गोकुळ औताडे, प्राचार्य आर.के.दातीर, प्राचार्य के. बी. शिंदे, प्राचार्य उगले यांच्यासह संगमनेर शहरातील संपादक व ग्रामिण पत्रकार, नागरीक, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.