अवश्य वाचा


  • Share

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी भूषण नावंदर, शुभलक्ष्मी बेलापूरकर इनरव्हीलच्या अध्यक्षा

संगमनेर (प्रतिनिधी) स्वार्थ विहरीत सेवेत समाजमान्यता मिळालेल्या रोटरी क्लब संगमनेर 2017-18 च्या अध्यक्षपदी भूषण नावंदर यांची तर सचिवपदी समीर शाह यांची, तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी शुभलक्ष्मी बेलापूरकर यांची तर सचिवपदी सपना नावंदर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती रोटरीचे मावळते अध्यक्ष सुनील कडलग व इनरव्हीलच्या अध्यक्षा रचना मालपाणी यांनी दिली. येथील रोटरी क्लब व इनरव्हील क्लबचे संयुक्त पदग्रहण मंगळवार, दि. 18 रोजी, मालपाणी हेल्थ क्लब येथे आयोजित करण्यात आले आहे. या समारंभास लायन्स क्लब जिल्हा 3234 डी 2 चे नवनिर्वाचित प्रांतपाल उद्योगपती गिरीष मालपाणी, महाबळेश्र्वर येथील प्रथितयश उद्योगपती व अंध असूनही मेणबत्ती निर्मितीमधून अनेकांना रोजगार देणारे व ऑलिम्पिक पारितोषिक प्राप्त भावेश भाटीया, रोटरी जिल्हा 3132 च्या उपप्रांतपाल डॉ.बिंदु शिरसाठ, रोटरी मावळते प्रेसिडेंट सुनील कडलग, सेक्रेटरी साईनाथ साबळे, इनरव्हील प्रेसिडेंट रचना मालपाणी, इनरव्हील डॉ.दिप्ती राजुस्कर उपस्थित रहाणार आहेत. रोटरीची कार्यकारीणी पुढीलप्रमाणे- प्रेसिडेंट भारतभूषण नावंदर, सेक्रेटरी समीर शाह, प्रेसिडेंट इलेक्ट ओंकार सोमाणी, आयपीपी सुनील कडलग, सार्जंट अट आर्म्स रोहीत कासट, क्लब ट्रेनर अजित काकडे, व्हा. प्रेसिडेंट विकास करंजेकर, जॉइंट सेक्रेटरी पवनकुमार वर्मा, ट्रेझरर- दीपक मणियार, क्लब ऍडमिनिस्ट्रेशन संजय लाहोटी, मेंबरशिप डेव्हलपमेंट रविंद्र पवार, रोटरी फाउंडेशन दिलीप मालपाणी, सर्व्हिस प्रोजेक्ट लोकल प्रमोद राजुस्कर, सर्व्हिस प्रोजेक्ट ग्लोबल संजय राठी, युथ सर्व्हिस संकेत काजळे, पब्लिक इमेज साईनाथ साबळे, लिटरसी नरेंद्र चांडक, विन्स विनायक नागरे, डिस्ट्रीक्ट एमफॅसिस धमेंद्र निहलानी, आर.आय.एमफॅसिस सचिन पलोड. इनरव्हील क्लब कार्यकारीणी प्रेसिडेंट शुभलक्ष्मी बेलापूरकर, सेक्रेटरी सपना नावंदर, व्हा. प्रेसिडेंट सीमा अत्रे, ट्रेझरर अश्र्विनी राठी, आर.एस.ओ.अनुराधा मालपाणी, इडिटर मंजु मणियार, सी.सी.मनोरमा साबळे, सी. एल. सी. सी. ज्योती पवार, स्वाती पडतानी. रोटरी नूतन वर्षाची सुरुवात करतांना रोटरी क्लबने, गंगामाता मंदिर ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक योगदिनाचे औचित्य साधून योग शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. योग शिबिरार्थींना प्रशिक्षक समिर शाह यांनी मार्गदर्शन केले. नवीन रोटरी वर्षारंभ 1 जुलै रोजी आगळ्या वेगळ्या वृक्षारोपन कार्यक्रम नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांचे हस्ते होणार आहे. रोटरीतर्फे नागरीकांना रोपे वाटप करण्यात येणार आहे. हे रोपे वाढवून नागरीकांनी एक वर्षानंतर ही रोपे रोटरीला परत करावयाची आहेत. रोटरी एक वर्षानंतर मोठ झालेली ही रोपे रोटरी वृक्षारोपन करून वृक्षसंवर्धन करणार आहे. 2 जुलै रोजी रोटरी निमा व इनरव्हील क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नूतन अध्यक्ष रो.भूषण नावंदर यांनी दिली.