अवश्य वाचा


  • Share

अविनाश धर्माधिकारी यांचे मंगळवारी संगमनेरात व्याख्यान

संगमनेर (प्रतिनिधी) जयहिंद करइर ऍकेडमी व संग्राम पतसंस्थेच्या वतीने माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मंगळवार दिंनाक 27 जुन 2017 रोजी सायंकाळी 4.00 वा. मालपाणी लॉन्स येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली आहे. माजी शिक्षणमंत्री आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर हे शैक्षणिकदृष्ट्‌या अतिशय प्रगतशील असून विद्यार्थ्यांच्या करइरसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी कला व क्रिडा क्षेत्रातही मोठे व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिंनाक 27 जुन 2017 रोजी सायंकाळी 4.00 वा. मालपाणी लॉन्स येथे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मा.शिक्षणमंत्री आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे हेही उपस्थित राहणार आहे. यावेळी दहावी व बारावीनंतरच्या सर्व विद्यार्थ्यां व पाकलकांना मोफत प्रवेश असणार आहे. तरी या व्याख्यानासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे. असे अवाहन पतसंस्थेचे चेअरमन डॉ.एन.एस. शेख , मॅनेंजर उमेश शिंदे व संचालक मंडळ यांचे वतीने करण्यात आले आहे.