अवश्य वाचा


  • Share

ग्रामीण मराठी पत्रकार संघातर्फे कृष्णप्रकाश यांच्या व्याख्यानाचे आयोजन

संगमनेर (प्रतिनिधी) शनिवार दि. 24 रोजी संगमनेर तालुका ग्रामिण मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र राज्यातील नामवंत पोलिस अधिकारी आय. जी. व्ही. आय. पी. कृष्णप्रकाश याचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष शकीलभाई शेख व विद्यमान अध्यक्ष रत्नाकर सातपुते यांनी दिली. मुलांचा शालेय जीवनप्रवास योग्य दिशेने जाण्यासाठी व भविष्यात योग्य नागरीक म्हणून जगण्यासाठी यशस्वी व्यक्तीचा जीवनप्रवास विदयार्थाना माहीत असणे गरजेचे असल्याने अशा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघातर्फे देण्यात आली. पोलिस अधिकारी कृष्णप्रकाश यांचा अहमदनगर जिल्हयातील कार्यकाळ सर्वांचा स्मरणात आहे. सिंघम म्हणून त्यांनी लावलेली शिस्त नगरकरांसाठी व जिल्हयातील इतर अधिकारी यांना प्रेरणादायी ठरली होती. संगमनेरमधील महाविद्यालयीन विदयार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी व विविध परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी अभ्यास व जीवनातील शिस्त महत्वाची असल्याने सदर अधिकारी आय.जी.कृष्णप्रकाश यांचे व्याख्यान सहयाद्री महाविद्यालयात पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्याचे आमदार व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत तसेच शिक्षक पदवीधर संघातील आ. डॉ. सुधीरजी तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित होणार्‍या या कार्यक्रमासाठी संगमनेर नगरपरीषदेच्या अध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे व प्रकल्प प्रमुख सौ. सुनिताताई कोडे उपस्थित राहणार आहे. संगमनेर व जिल्हयातील पत्रकारांनी व विदयार्थ्यानी उपस्थित राहावे असे आवहान संगमनेर तालुका ग्रामिण मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.