अवश्य वाचा


  • Share

संगमनेर नविन हायटेक बसस्थानकाची आ. थोरातांकडून पाहणी

संगमनेर (प्रतिनिधी ) संगमनेर शहर हे शैक्षणिक, सहकार, आर्थिक व व्यापारी क्षेत्रातील प्रगतीमुळे झपाट्याने वाढले असून विविध क्षेत्रात आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा लौकिक वाढला आहे. शहराच्या वैभवात भर टाकणारी सर्वसुविधांयुक्त असे संगमनेरच्या नव्या बसस्थानकाच्या कामाची पाहणी मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. संगमनेर येथे नव्याने बांधण्यात येणार्‍या आधुनिक व भव्य एसटी बस स्थानकाच्या पहाणी प्रसंगी आ. डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.हर्षल तांबे, अजय फटांगरे, भाऊसाहेब कुटे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, विश्वास मुर्तडक, जयवंत पवार, किशोर पवार, गजेंद्र अभंग, रामहारी कातोरे, बी.आर.चकोर, श्याम भडांगे, सतिष आहेर, नवनाथ अरगडे, एस टी महामंडळाचे अमोल बनकर, पी.एस. देवकर, योगेश दिघे, साजिद पठाण, बाळासाहेब गोसावी, निखील कातोरे, गणेश गुंजाळ आदि मान्यवर उपस्थित होते. या नव्या होणार्‍या बसस्थानकामध्ये अत्याधुनिक भव्य पार्किंग व्यवस्था,शॉपींग मॉल, हॉटेल सुविधा, बसस्थानकामध्ये प्रतीक्षालय, सुसज टॉयलेट व्यवस्था, बस डेपो व बसस्थानक परिसरात कॉक्रेटीकरण,पेव्हीग ब्लॉक अशा अत्याधुनिक सुविधांसह शहराच्या वैभवात भर टाकणारी सर्व सुविधांयुक्त असे नवे हायटेक बसस्थानक लवकरच कार्यन्वित होणार आहे. यावेळी आ. थोरात म्हणाले कि, नव्याने अद्यावत होत असलेल्या बसस्थानक हे विकासाच्या दृष्टीने वैभवाचे पाऊल आहे.शहरात बायपास, प्रवरा नदीवर विविध पूल, जुन्या पुलास नवीन समांतर पूल, अद्यावत तहसील इमारत, प्रांत कार्यालय, नगरपालिका, पंचायत समिती ही वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहे. एसटी महामंडळ व विद्युत महामंडळ ही जनसामान्यांचे जिव्हाळ्यााची आहेत. एसटीने खर्‍या अर्थाने गोरगरिबांची सेवा केली आहे. नव्याने होत असलेले बसस्थानक हायटेक असून येणार्‍या 50 वर्षांचे नियोजन करुन हे बांधत आहोत. सर्वसुविधांयुक्त असलेले हे बसस्थानक निश्चितपणे राज्यासाठी मॉडेल ठरेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. आ. डॉ.तांबे म्हणाले कि, आमदार बाळासाहेब थोरात हे विकासाचे दृष्टी असलेले नेते आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यातून मॉडेलरुपी बसस्थानक संगमनेरात होणार आहे. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांसाठी ही चांगल्या सुविधा मिळणार आहे.