अवश्य वाचा


  • Share

संगमनेर बाजारसमितीमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर

संगमनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अग्रेसर असलेल्या संगमनेर बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून परिसरातील शेतकर्‍यांना जास्तीत जास्त भाव देण्यासाठी बाजार समिती व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. मागील आठवड्यात 47 हजार क्विंटल आवक असून 500 ते 700 रुपये पतिक्विंटल बाजारभावाने टोमॅटोची विक्री झाली आहे. संगमनेरच्या शेतकर्‍यांच्या टोमॅटो खरेदीसाठी नाशिक, नगर, मुंबई, गुजरात येथील व्यापारी मालखरेदीसाठी येत असल्याने शेतकर्‍यांना स्पधार्र्त्मक दर मिळत आहे. तसेच आडत व इतर छुपे खर्च नसल्याने योग्य दराने व खात्रीशीररित्या शेतमालाची विक्री केली जाते. दररोज 100 पेक्षा अधिक गाड्या भरुन बाहेर परराज्यात जातात. शेतकर्‍यांनी आपला माल खात्रीशीर विक्रीसाठी संगमनेर बाजारसमितीमध्येच आणावा असे आवाहन सभापती शंकरराव खेमनर, उपसभापती सतिषराव कानवडे व सचिव सतिषराव गुंजाळ यांनी केले आहे.