अवश्य वाचा


  • Share

कर्जबाजारी शेतकर्‍यांना पतसंस्थानी धीर द्यावा - ना. देशमुख

अकोले(प्रतिनिधी) कर्जबाजारी शेतकर्‍याला न्याय देण्याची भूमिका पतसंस्थने घ्यावी असे आदेश महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी दिले शिवसेना खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित केली होती. अकोले तालुक्यातील मन्याळे येथील शेतकरी भैरवनाथ जाधव यांचे कर्ज प्रकरणी सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांचे दालनात बैठक झाली. शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या पुढाकाराने हि बैठक आयोजित केली होती यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, भाजप तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मन्याळे चे सरपंच अमित कुर्‍हाडे, शिवसेना शाखाप्रमुख गजानन हांडे, यशोमंदिर पतसंस्था चेअरमन अशोक वाळुंज, संचालक दिनेशचंद्र हुळवले, जिजाभाऊ मते, भिमाजी आरोटे आदी उपस्थित होते. सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी पतसंस्थे ने समनव्य करून शेतकरी व पतसंस्था जगली पाहिजे असा माध्यम मार्ग काढण्याचे आदेश दिले . पतसंस्थेने कर्ज देतानाच्या त्रुटी सहकारमंत्री यांचे निदर्शनास आणून देण्यात आले . शेतकरी यांनी मला पूर्ण कर्ज मिळाले नाही त्यामुळे मी घरासाठी जे कर्ज घेतले ते पूर्ण झाले नाही तसेच पाच , सात वर्षांपासून पीकपाणी नसल्याने मी कर्जबाजारी झालो असून आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले. पतसंस्थाचे चेअरमन व संचालक यांनी कर्ज जर माफ केले तर ठेवीदार ठेवी ठेवणार नाही , पतसंस्थचे दुसरे कर्जदार कर्ज भरणार नाही असे सांगितले. कर्जदार यांना कर्ज देताना पतसंस्थेचे त्रुटी निदर्शनास आले असलेमुळे काही ठराविक रक्कम भरून शेतकर्‍याला न्याय देण्याची भूमिका सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांना भाजप शेतकरी नेते पाशा पटेल यांनी पटवून दिली. भैरवनाथ जाधव यांनी विहिरीमध्ये सात दिवस उपोषण केले होते खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी शिष्टाई करीत हे उपोषण मागे घ्यावयास लावले होते. शिवसेना हा पक्ष शेतकर्‍यांचे बाजूचा असून जाधव यांना न्याय मिळवून देणार असलेचेही खा. लोखंडे यांनी सांगितले