अवश्य वाचा


  • Share

संगमनेर मर्चंट्स बँकेचा 52 वा वर्धापन दिन साजरा! रक्तदान शिबीराला उत्सफुर्त प्रतिसाद - 113 पिशव्या रक्त संकलन

संगमनेर (प्रतिनिधी) दि संगमनेर मर्चंट्स बँकेच्या 52 व्या वर्धापनदिनानिमित्त संगमनेर मर्चंट्स बँक व संगमनेर व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात 56 पिशव्या रक्त संकलित झाले. बँकेचे विद्यमान संचालक आणि माजी चेअरमन सुनील दिवेकर यांच्याही वाढदिवसानिमित्त आज मालदाड रोड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात संकलित झालेल्या 57 पिशव्याही त्यांनी मर्चंट्स बँकेच्या रक्तदान शिबिरात जमा केल्याने एकंदर 113 पिशव्या रक्त संकलीत झाले. मर्चंट्स बँकेच्या मुख्य कार्यलयात सकाळी 9 ते 2 या वेळात घेतलेल्या शिबिरात बँकेचे सभासद ठेविदार खातेदार व ग्राहक यांनी उत्साहाने सहभाग घेतला. बँकेचे चेअरमन प्रकाश राठी, व्हाईस चेअरमन गुरूनाथ बाप्ते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कलंत्री उपाध्यक्ष योगेश कासट व बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बँकेचे संचालक मंडळाचे सदस्य, व्यापारी असोसिएशन चे सदस्य व सेवक वर्ग यांनीही या रक्तदान शिबिरात प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपली सामाजीक बांधिलकी व जबाबदारी पूर्ण केली. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या भावनेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि प्रमुख मार्गदर्शक राजेशभाऊ मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्पण ब्लड बँकेच्या कुशल पथकाच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले. बँकेचे चेअरमन प्रकाश राठी आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कलंत्री या दोघांनीही रक्तदानात सक्रीय सहभाग घेतला. बँकेचे सभासद सर्वश्री अमित अट्टल, प्रशांत कासट, विनोद बंग, सतीश आहेर, श्रीकांत मालाणी, शरद गाडेकर, विशाल नावंदर, श्रीकांत मणियार, मनीष मणियार, यांचेसह खातेदार आकाश कडलग, पंकज आसावा, दर्शन पवार, लक्ष्मीकांत हजारे, विनोद आडेप, दर्शन मुर्तडक, अक्षय वाकचौरे, ओंकार इंदाणी, गौरव राठी यांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र वाकचौरे, माजी व्हाईस चेअरमन सतीश लाहोटी, तज्ज्ञ संचालक ओंकार (राजू) बिहाणी, सीए संजय राठी, डॉ. अर्चना माळी, डॉ. संजय मेहता, ओंंकार सोमाणी, ज्येष्ठ संचालक दिलीपशेठ पारख, श्रीगोपाळ पडतानी, सुनील दिवेकर, राजेश करवा, संदीप जाजू, संतोष करवा, ज्ञानेश्वर करपे, सेवक प्रतिनिधी वाघोबा शेलार, विजयेंद्र टिळे,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम, महादेव क्षत्रीय, सौ. वर्षा गोरे, बँकेचा सेवक वर्ग, व्यापारी असोसिएशनचे सदस्य आदी याप्रसंगी उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र, भेटवस्तू व अल्पोपहार देण्यात आला. बँकेचे संचालक मंडळ सदस्य आणि बँकेचा सर्व स्टाफ यांनी उत्स्फूर्त रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला.