अवश्य वाचा


  • Share

सेतू सुविधा केंद्रातून अडीच लाख दाखल्यांचे वितरण एसएमएस मुळे दाखल्यांची माहितीचा आदर्शवत उपक्रम

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्याचे मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या सुवर्ण जयंती राजस्व अभियानातून महसूल विभागाची लोकाभिमूखता वाढली आहे. तालुक्यातील नागरिक व विद्यार्थ्यांना चांगल्या व त्वरीत सुविधा पुरवितांना संगमनेरच्या सेतू केंद्रानेे मागील 3 वर्षांत 2 लाख 50 हजार दाखल्यांचे वितरण केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुहास आहेर व व्यवस्थापक गोरक्षनाथ वर्पे यांनी दिली. तालुक्यातील नागरिक व विद्यार्थ्यांना तात्काळ व चांगली सुविधा मिळावी यासाठी राज्याचे मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आ.डॉ सुधीर तांबे यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील संगमनेर तालुका ऍग्रीकल्चरल मार्केर्टिंंग को. ऑपरेटीव्ह सोसायटी ली. व शारदा ग्रामीण पतसंस्था या संस्थेच्या वतीने तहसील कार्यालय संगमनेर येथे सेतु सुविधा केंद्र कार्यरत आहे. या सेतु केंद्रामध्ये अत्याधुनिक प्रणाली वापरतांना सेवा हमी कायद्यातील संपुर्ण माहिती असणारे तज्ञ व अनुभवी संगणक ऑपरेटर, अद्यावत संगणक, हाय स्पिड इंटरनेट सुविधा इत्यादी व्यवस्था संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. सेतु सुविधा केंद्रामध्ये अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदाराचे मोबाईलवर अर्ज दाखल झाला, पुर्तता व अपुर्तता आणि दाखला तयार अशा प्रकारचे तीन एमएमएस देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जातीच्या दाखल्यांव्यतीरीक्त इतर सर्व दाखले दोन दिवसांत उपलब्ध करुन दिले जात आहे. या सेतू सुविधा केंद्रामधून मागील तीन वर्षांत विविध प्रकारच्या 2 लाख 50 हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांचे यशोधन या संपर्क कार्यालया शेजारी मोफत आधार नोंदणी, आधार कार्ड मध्ये नांव व पत्ता दुरुस्ती, मोबाईल क्रमांक व इमेल जोडणी, फोटो दुरुस्ती इत्यादी कामे केली जात आहे. या आधार नोंदणी केंद्रामधून आत्तापर्यंत 50 हजार नागरीकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.