अवश्य वाचा


  • Share

राळेगणसिध्दी येथे सर्वात प्रथम ग्रामरक्षक दलाची स्थापना

नगर (प्रतिनिधी) व्यसनधिनतेला आळा घालण्यासाठी गावपातळीवर ग्रामरक्षकल दलाची स्थापना करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले. त्यानुसार सर्वप्रथम पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीने या दलाची स्थापना केली. जिल्ह्यातील 126 ग्रामपंतायतींनी प्रांताधिकार्‍याकेड हे दल स्थापन करण्याबाबत प्रस्ताव पाठवले आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाते उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशंत शिर्के यांनी सोमवारी दिली. उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यंतरी राळेगणला येऊन ज्येष्छ समाजसेवक अण्णा हजारे यांची ग्रामसुरक्षा दलाच्या स्थापनेबाबत भेट घेतली होती. जिल्ह्यातील प्रत्येक गावात 15 मे पुर्वी विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा ठराव घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ठरावाच्या प्रती उपविभागीय अधिकार्‍यांना सादरल करायच्या आहेत. मुंबई दारूबंदी अधिनियमानुसार प्रत्येक गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचे निर्देश दिेले आहेत. शिर्के म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी हे ग्रामरक्षक दल महत्त्वाचे योगदान देणार आहे. जिल्ह्यात प्रथमच राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीने ग्रामरक्षक दलाची स्थापना केली आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात 126 ग्रामपंचायतींनी दल स्थापन करण्यासाठी ठरावाच्या प्रती प्रांताधिकार्‍यांकडे सादर केल्या आहेत. संगमनेर 17, राहुरी 1, श्रीरामपूर 30, नेवासे 9, शेवगाव 40, कर्जत 2, श्रीगोंदे 15, पारनेर 11, तर नगर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा त्यात समावेश आहे. ज्या ग्रामपंचायतींनी दलाच्या स्थापनेबाबत उपविभागीय अधिकार्‍यांना प्रस्ताव सादर केले नाहीत, अशांंनी लवकरात लवकर ते सादर करावेत, अशे अवाहनही शिर्के यांनी केले.