अवश्य वाचा


  • Share

घर जळालेल्या कुटुंबाला आधार फाउंडेशनतर्फे मदत

आश्वी (प्रतिनिधी) तालुक्यातील डोळासणे येथील धुमाळवाडी या छोट्याशा गावात राहणार्‍या रामनाथ नामदेव धुमाळ या शेतकर्‍याच्या राहत्या घराला दुपारी अचानक आग लागली. या घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र संसारोपयोगी साहित्य जळाले. शेजार्‍यांनी केलेल्या मदतीमुळे थोडे धान्य वाचले. या घटनेची माहिती आधार फाउंडेशनचे सदस्य रामदास बालोडे यांना समजली. इतर सहकार्‍यांशी चर्चा करुन, या कुटुंबाला मदत करण्याचे ठरले. थोडेसे अंथरूण, पांघरुण, गरजेपुरता किराणा माल, भांडी, वापरण्यायोग्य कपडे, अशी सामग्री घेऊन आधार च्या सदस्यांनी धुमाळ यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांना मानसिक आधार दिला. या वेळी परिसरातील काही शेतकरी, युवक जमा झाले होते. महिना केवळ 10 रुपये या प्रमाणे मदत करणार्‍या सदस्यांच्या आधारे उभी राहिलेली ही संघटना असल्याचे समजून, त्यांच्या कामाची माहिती घेतल्याने प्रभावित झालेल्या 16 शेतकर्‍यांनी वार्षिक 120 रुपये देऊन आधार चे सदस्यत्व स्वीकारले. विशेष म्हणजे यात जळीत झालेले रामनाथ धुमाळ यांचाही समावेश आहे. आधार चे सुखदेव इल्हे, रामदास बालोडे, तान्हाजी आंधळे, लक्ष्मण कोते, संतोश टावरे, संतोष धुमाळ, नानाभाऊ बोंबले, नामदेव धुमाळ, विनायक फटांगरे, भाऊसाहेब भागवत, संतोष देशमुख, नारायण भागवत, प्रवीण धुमाळ, गुलाब धुमाळ, योेगेश धुमाळ, नितीन पोखरकर उपस्थित होते.