अवश्य वाचा


  • Share

डॉ. बांगर पालीकेचे सीओ आहे की, कॉंग्रेसचे कार्यकर्ते - कतारी

सगंमनेर (प्रतिनिधी) संगमनेर नगरपालीकेचे मुख्याधिकारी संचिन बांगर पालीकेत रूजू झाल्यापासून कॉंग्रेसच्या हातचे बाहुले बनले आहे. प्रत्येक निर्णय घेतांना ते कॉंग्रेस नेत्याना विश्वासात घेतल्या शिवासय घेत नाही. कॉंगेस नेत्यांच्या कामांना प्राधान्य देतात. शासनाचा पगार घेऊन राजकीय कामे करणारे सचिन बांगर नगरपालीकेचे मुख्याधिकारी आहेत की, कॉंग्रस कार्यकर्ते आहे? असा सवाल शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी केला आहे. संगमनेर नगरपालीका निवडणूक जाहिर झाल्यापासून ते वॉर्ड रचना तयार करतांना कॉंग्रेस पक्षाला फायदा होईल याचा विचार प्राधान्याने करण्यात आला. या संदभार्र्त माहिती देतांना कतारी यांनी सांगितले की, कोणतेही कारण नसतांना मोमीनपुरा वॉर्ड तोडुन तो इंदिरा नगर प्रभाग 8 ला जोडण्यात आला. 9 नंबर वॉर्डाचीही तोडफोड करून कॉंग्रेसला फायदा होईल याची काळजी मुख्याधिकारी भांगर यांनी घेतली. असाच फ्रकार त्यांनी 10,12 व 13 वॉर्डातही केला. नुकत्याच झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्येही बांगर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर भेदभाव करण्यात आला. बेकायदा अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढतांना कॉंग्रेसच्या काही नेत्यांना झुकते माप देण्यात आले. तर गरिब टपरी धारकांचा संसार मास्त उध्वस्त करण्यात आला. टपरीधारकांची गुप्त बैठक कॉंग्रेस कार्यालयात घेण्यात आली. या बेठकीनंतर अशोक स्तंभ येथील काढलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले. तसेच 6 मे रोजी कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीला आपण हजर कसे राहिलात याचा खुलासा आपण करावा. आपल्याला कॉंगेस पक्षाचा इतकाच पुळका असेल तर आपण शासकीय नोकरी सोडावी व रितसर कॉंग्रेस पक्षात प्रवेश करावा असे आवाहनही अमर कतारी यांनी केले आहे. अतिक्रमण मोहिम संपल्यानंतर 8 मे रोजी मुख्याधिकारी बांगर स्थानिक कार्यकर्त्यांसमवेत शासकीय कार्यलयीन वेळेत कॉंग्रेस नेतृत्वाच्या घरी गुप्त मिटींग कसे घेतात? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. मोठा गाजावाजा अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. मात्र काही दिवसातच शहरात पुन्हा अतिक्रमण होत असतांना दिसत आहे. पालीकेने आ मोहमेत पाडलेली अनेक बांधकामे पुन्हा एकदा उभे राहतांना दिसत आहे. यात कॉंगे्रस नेत्यांच्या अतिक्रमणाचा मोठा भरणा आहे. जाणीवपूर्वक कॉंग्रेस नेत्यांना, कार्यकर्त्यांना खुष ठेवण्याचे काम करत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी बांगर यांना उत्कृष्ठ कॉंग्रेस कार्यकर्ता पुरस्कार का देऊ नये? असा खोचक सवाल कतारी यांनी विचारला आहे. या निवेदनावर ज्ञानेश्वर कांदळकर, पप्पू कानकाटे, अमोल कवडे, ऋषीकेश शिंदे, रमेश काळे, अमित चव्हाण, समिर ओझा, जालिंदर लहामगे, दिपक साळुंके, कैलास कासार, फैजल सयय्यद, इम्तीयाज शेख आदिंच्या सह्या आहेत.