अवश्य वाचा


  • Share

जि.प. सदस्य मिलिंद कानवडे यांच्या प्रयत्नातून पेमगिरीकरांना मिळणार स्वच्छ पाणी

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे यांच्या प्रयत्नातून आणि वर्षा ड्रीप सिस्टिमचे नितीन कानवडे यांच्या सहकार्याने शुद्ध पाण्याचे आर.ओ.सिस्टिम मशीनचे उदघाटन संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, वर्षा ड्रीप सिस्टिमचे नितीन कानवडे, पंचायत समितीच्या सभापती सौ.निशाताई कोकणे, सौ.सुनीताताई कानवडे, पेमगिरी गावचे सरपंच सोमनाथ गोडसे, रावसाहेब डुबे, शांताराम डुबे, उमेश बैचे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, जिल्हा परिषदेच्या संगमनेर खुर्द गटातून निवडून आलेले मिलिंद कानवडे यांनी या गटाचा विकास करण्याचा संकल्प केला असून त्याची हि सुरुवात आहे. तालुक्यात नव्हे तर राज्यात आदर्श असा संगमनेर खुर्द गट मिलिंद कानवडे हे नक्कीच बनवून दाखवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त करत या शुद्ध पाण्याचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य मिलिंद कानवडे म्हणाले कि, संगमनेर खुर्द गटातील सर्व गावांना शुद्ध पाणी देण्याचा संकल्प असून पुढील महिन्यात गटातील सर्व गावे हागणदारी मुक्त करण्याचा मानस आहे. अशा प्रकारचे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी गावातील सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.