अवश्य वाचा


  • Share

विखेंचा प्रवेश ठरला केवळ मुहूर्त बाकी - महाजन

मुंबई (वृत्तसंस्था) राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्‍चित आहे. केवळ मुहूर्त बाकी आहे. तारीख ठरायची आहे,’ असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज स्पष्ट केलं. काँग्रेस पक्षानं मुलाला लोकसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्यामुळं नाराज झालेल्या राधाकृष्ण विखेपाटील यांनी भाजपचा पर्याय निवडला होता. मुलाला भाजपची उमेदवारी मिळवून देऊन मोठ्या मताधिक्यानं निवडूनही आणलं. त्यामुळं आता विखे-पाटील यांचं राजकीय वजन वाढलं आहे. भाजप प्रवेशानंतर राज्यातील सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर विखे-पाटील यांनी आज भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, तो मुहूर्त आणखी लांबणीवर पडला आहे. खुद्द महाजन यांनीच याबाबतची माहिती दिली. विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे, असं ते म्हणाले. ’सध्याच्या परिस्थितीत कोणालाही काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये राहण्याची इच्छा नाही. विखे यांच्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा महाजन यांनी केला. विखे-पाटील यांनीही या भेटीनंतर भाजप प्रवेशाचे संकेत दिले. गिरीश महाजन यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी मी त्यांची आज भेट घेतली. ’पूर्वीपासून माझी महाजनांशी मैत्री आहे. आता एकत्र मिळून काम करणार आहोत. .