अवश्य वाचा


  • Share

जिल्हा परिषदेकडून मिळणार मुलींना स्वसंरक्षणाचे धडे -सौ. नागवडे

नगर (प्रतिनिधी) स्वसरंक्षणासाठी जिल्हा परिषद मुलींना कराटेचे प्रशिक्षण देणार आहे. यापूर्वी हा निर्णय झाला असून, निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.अनुराधा नागवडे यांनी दिली. सौ.नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालकल्याण समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. बैठकीस सौ.सुनिताताई भांगरे, अँड़रोहिणी निघुते, सौ.मिरा शेटे, सौ.राणी लंके, सौ.पुष्पा रोहम, सौ.अनुसया होन, सौ.मनिषा ओहोळ आदी उपस्थित होत्या. जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील ज्या मुलांचे आधारकार्ड अद्यापही काढण्यात आलेले नाहीत, त्यांचे आधारकार्ड काढण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. अंगणवाडीमधील कुपोषित बालके सुदृढ करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे सांगण्यात आले. 2016-17 चे जि.प.सेस निधीचे सुधारित अंदाजपत्रक तसेच 2017-18आर्थिक वर्षाचे मूळ अंदाजपत्रक समितीपुढे अवलोकनार्थ सादर करण्यात आले. विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होवून अंगणवाडीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे निश्चित करण्यात आले. मागील सभेचे इतवृत्त वाचून कायम करण्यात आले. एकात्मिक बाल विकास सेवा योजनांचा आढावा घेण्यात आला.