अवश्य वाचा


  • Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुध्दांचे विचार आचारणात आणण्याची गरज - बाबुराव गुरव

संगमनेर (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब व भगवान गौतम बुद्धांचे विचार वाचण्यापेक्षा ते जगणे व आचरणात आणणे आजच्या काळात महत्वाचे आहे असे विचार साहित्यिक बाबुराव गुरव यांनी व्यक्त केलेे.नुकताच बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर मध्ये भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ. गुरव यांनी सांगितले की, भगवान गौतम बुद्ध हे भरताचे आयडॉल आहेत, भारताची राज्यघटना भगवान गौतम बुद्धांच्या समता-बंधुता व सामाजिक न्याय या विचारसरणीवर आधारित आहे. या प्रसंगी प्रा. डॉ. रत्ना वाघमारे यांनी गौतम बुद्ध यांचा सम्यक धम्म व सामाजिक परिस्थिती या विषयावर बोलताना देशालाच नव्हे तर जगाला बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी शाहू फुलेे आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी जाती पातीच्या लढाईमध्ये श्रीमंत विरुद्ध गरीब यांचे ऐक्य टिकवण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, प्रतिगामी शक्ती वाढत असून लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी संविधानाचे संरक्षण करण्याचे काम जागृतपणे करण्याचे काम सर्वांनी करणे गरजेचे आहे. या प्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जि.प.कृषी व पशु संवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, कॉ.मोहनराव देशमुख, कॉ. प्रा. महेबूब सय्यद, माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, उप- शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, विलास साठे, भीमराव पाडळे, प्रा.डी.आर जाधव, दुध संघाचे संचालक माणिकराव यादव, विठ्ठल वाघमोडे, आदि उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर वयाच्या सतराव्या वर्षी इंजिनियरिंग मध्ये पेपर वाचन करत अपंगांसाठी मॉडेल तयार करणार्‍या अजिंक्य अर्जुन वाघ यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रवीण गवांदे यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रमुख संयोजक रवींद्र पटेकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु.एल.गायकवाड,चंद्रकांत चव्हाण यांनी केलेे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रहार मोकळ, के.सी.बागुल, सुखदेव इल्हे, आनंद दारोळे, विश्‍वनाथ आल्हाट, आबासाहेब धाकतोडे,अनिल गायकवाड