अवश्य वाचा


  • Share

संकटातील विकृती लज्जास्पद बोटा शिवारात हापूस लुटला

संगमनेर (प्रतिनिधी) फळांचा राजा रत्नागिरी हापूस सध्या भाव खातो आहे. एक किलोला 250 रुपये मोजावे लागत असतांना आज गुरुवारी सकाळी 9 वाजता पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सुमारे तीन लाखाचा रत्नागिरी हापूस घेऊन जाणारी पिकअप जीप उलटली. या अपघातात संजय खानविलकर (वय 45)व चालक हैदर पिरानाईक (दोघे रा. बेनी बुद्रुक, जि. रत्नागिरी) हे दोघे जण जखमी झाले. यामधील संजय खानविलकर यांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. मात्र जीपमधील जखमींना मदत करण्याचे सोडून स्थानिकांसह जाणार्‍या येणार्‍यांनी रत्नागिरी हापूस लांबविण्यातच धन्यता मानली. रत्नागिरी हून नाशिककडे पिकअप जीप क्रमांक एम.एच. 08 डब्लू 3098 हा पुण - नाशिक महामार्गाहून जात असतांना बोटा शिवारात विद्यानिकेतन कॉलेज समोरील एका वाहनाने ब्रेक दाबला त्यामुळे पिक अप जीप चालकाने देखील ब्रेक दाबला मात्र वेग जास्त असल्याने तो उलटला . जशी पिकअप जीप उलटली तसे आंब्याच्या लाकडी पेट्या जीपबाहेर फेकल्या गेल्या. जाणार्‍या येणार्‍यांना रत्नागिरी हापूस आंब्याचे दर्शन होताच प्रत्येक जण त्यावर तुटून पडला. रस्त्यावर सर्वत्र आंबा पडलेला होता तर जाणारे येणारे थांबून आंबा गोळा करत होते. तर काही लोकांनी आंब्यावर यथेच्छ ताव मारला. रस्त्यावर अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करणे हे मानवतेच्या दृष्टीने हे सर्वांचे कर्तव्य असते. शासनानेही कायद्यामध्ये बदल करून रस्ते अपघातातील साक्षीदारांवरचा त्रास कमी केला आहे. तसेच महामार्गावर मोठमोठे फ्लेक्स लावून अपघात ग्रस्तांना मदत करा असे अव्हान केले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अपघात घडल्यानंतर कोणीही मदतीला थांबत नाही. तसेच ज्या वहानाचा अपघात घडला. त्या वहानात दारू, फळे, इतर खाद्यपदार्थ असल्यास नागरिक अपघात ग्रस्तांकडे दुर्लक्ष करून या वस्तू पळविण्यात धन्यता मानतात. ही मोटी शोकांतीका आहे. नागरिकांच्या या पळवापळवीमुळे अनेकदा उपघातग्रस्त जखमींचा बळीही जातो. मात्र त्याचे कुणाल सोयर सुतक नसते. आजकालच्या मोबाईल जमान्यात संकाटत सापडलेल्या किंवा मरणाच्या दारात उभ्या असलेल्यांना मदत करण्या ऐवजी त्यांची फोटो व शुटिंग करण्यात धन्यता मानली जाते. यातून समाजात वाढक चाललेली विकृत माणसिकतेचे दर्शन घडते. ज्या शेतकर्‍याने मोठ्या कष्टाने हा आंबा पिकविला होता व ज्या व्यापार्‍याने तो खरेदी केला हेता त्यांना या लुटमारी नंतर किती मोठा फटका बसेल यांची कोणीही चिंता न करता व अपघाताकडे दुर्लक्ष करून हापूस आंबा लुटण्यातच धन्याता मानली. हे समाजाच्या दृष्टीने लज्जास्पद गोष्ट आहे.