अवश्य वाचा


  • Share

तीन तलाकचा मुद्दा लवकरच निकाली निघणार सुप्रिम कोर्टात तीन तलाकवर सुनानणी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तीन तलाक मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. मुस्लिमांत प्रचलित तीन तलाक आणि हलालावर सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठाने गुरुवारपासून नियमित सुनावणी घेत आहे. यात बहुविवाहवर बोलणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. घटनापीठात सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्यासह न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर.एफ. नरिमन, न्या. यू.यू. ललित आणि न्या. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. गुरुवारच्या सुनावणीत कोर्ट सर्वप्रथम सुनावणीचे मुद्दे निश्चित करत आहे.केंद्र सरकार, याचिकाकर्त्या महिला आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह सर्व पक्षकारांनी सुप्रीम कोर्टासमोर लेखी युक्तिवाद सादर केलेेले आहेत. याआधारे सुप्रीम कोर्ट स्वत: सवाल ठरवणार आहे. सुनावणीत त्यांच्यावरच विचार केला जाईल. सुप्रीम कोर्टाने आधीच आपण समान नागरी संहितेच्या मुद्द्यावर सुनावणी करत नसल्याचे स्पष्ट केलेलेे आहे. गाजियाबादचे शब्बीर यांच्या मुलीचा हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ केला. यानंतर पतीने तिला ट्रिपल तलाक देऊन नाते तोडले. शब्बीर यांना वाटले, की स्थानिक आमदार अतुल गर्ग त्यांची मदत करू शकतील. या अपेक्षेने शब्बीर गर्ग यांच्याकडे पोहोचले असता त्यांनी जावयाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. शब्बीर यांच्या मुलीला आणि दोन वर्षाच्या मुलाला संरक्षण सुद्धा मिळेल असे आश्वासन गर्ग यांनी दिले. त्यांच्याकडे कोर्टात जाण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय राहिला नाही. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ट्रिपल तलाकला वैध मानते. त्यामुळे, कायद्यात बदल न करता सरकारला काहीही करणे शक्य नव्हते. केवळ शब्बीर यांची मुलगीच नव्हे, तर हजारो मुस्लिम महिला सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. सुप्रीम कोर्ट फक्त मुस्लिम समुदायात प्रचलित या प्रथांच्या घटनात्मक वैधतेची तपासणी करेल. केद्र सरकारने तीन तलाकवर बंदीच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. दुसरीकडे, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा युक्तिवाद आहे की, या प्रथा न्यायिक समीक्षेच्या कक्षेत येत नाहीत. सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांनी तीन तलाकच्या मुद्द्यावर लवकर निर्णय घेण्यासाठी उन्हाळी सुट्‌ट्यांत दररोजच्या सुनावणीची व्यवस्था केली आहे.