अवश्य वाचा


  • Share

पाटाच्या पाण्यात बुडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू आश्वी खुर्दच्या प्रवरा उजव्या कालव्यात घडली घटना

आश्वी खुर्द (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे प्रवरा उजव्या कालव्यात मित्रा समवेत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात वाहुन जात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिबलापुर येथील शाळकरी मुलागा पंकज रवी मुन्तोडे (वय-13) व विवेक रवी मुन्तोडे (वय-14) हे दोघे आश्वी खु येथील प्रवरा उजव्या कालव्याला पाणी आल्याने बुधवारी दुपारी दोन वाजेचा सुमारास वीज वितरण केंद्र परिसरात पोहण्यासाठी आले होते. या ठिकाणी त्यांनी पाण्यात उतरुन पोहण्यास सुरवात केली. मात्र त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पंकज व विवेक पाण्यात बुडु लागल्याने त्यांनी आरडा-ओरड करण्यास सुरवात केली. यावेळी विवेकला जवळच पोहत असलेल्या आश्वी येथील तरुणांनी बाहेर काढले तर पंकज मुन्तोडे याचा त्यानी शोध घेतला असता तो पाण्यात वाहुन गेला होता. घटना समजताच आश्वी पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेेबल उल्हास नवले, भारत जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आश्वी परीसरातील तरुणांच्या साह्याने शोध मोहीम सुरू केली. पाटबंधारे विभागाला या घटनेची माहिती मिळताच कालव्याचे पाणी कमी करत त्यांनी ही शोधमोहिम हाती घेतली. पोलिस, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी, आश्वी व शिबलापूर येथील तरुण व ग्रामस्थांनी शर्थीचे पर्यत्न करत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पंकजचा मृतदेह बाहेर काढण्यात त्याना यश आले आहे. सध्या प्रवरा नदीला पाणी असुन पाटालाही पाणी सोडण्यात आले आहे. उन्हाळा असल्याने अनेकजण पोहण्यासाठी या पाटात जात असतात. मात्र पाण्याचा अंदाज येत नेसल्याने अनेकांचा अत्तापर्यंत बुडून मृत्यु झाला आहे. पंकजच्या घरची परिस्थिती हालाकिची असून त्याला आई, वडील, दोन भाऊ व एक बहिन असा परिवार आहे. तर त्याच्या या अपघाती निधनामुळे आश्वी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.