अवश्य वाचा


  • Share

अपहृत लष्करी अधिकार्‍याच्या शरिराची पाक सैन्यांकडून चाळण

जम्मू-काश्मिर (वृतसंस्था) दक्षिण काश्मीरमधील शोपिया येथे बुधवारी सकाळी अपहृत लष्करी अधिकार्‍यांचा मृतदेह आढळला. लेफ्टनंट उमर फैयाज असे मृत लष्करी अधिकार्‍यांचे नाव आहे. काल (मंगळवारी) उमर फैयाज यांचे अतिरेक्यांनी अपहरण केले होते. नंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. पण बुधवारी सकाळी फैयाज यांचा मृतदेह हरमन चौकात आढळून आला. अतिरेक्यांनी गोळ्या झाडून फैयाज यांचे शरीर अक्षरश: चाळणी केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मिळालेली माहिती अशी की, उमर फैयाज हे कुलगाम येथील रहिवासी होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी लष्करात भर्ती झाले होते. उमर मंगळवारी एका विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याचवेळी काही अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण केले. नंतर त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली. मृतदेह फेकून अतिरेकी पसार झाले. सूचना मिळताच पोलिसांनी उमर फैयाज यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकर्‌यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात शोपियामध्ये पेट्रोलिंग करणार्‍या लष्कराच्या जवानांवर दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला होता. या हल्ल्‌यात दोन जवान शहीद झाले होते. तसेच एका नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर काश्मीर खोर्यात लष्कराने सर्च ऑपरेशर्‍ खोर्‍यात दहशतवादी मोठ्या संख्येने सक्रीय झाले असल्याचे समोर आले आहे.