अवश्य वाचा


  • Share

खेड्यातील मुले अंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकतात ही अभिमानाची गोष्ट - गोडसे

अकोले (प्रतिनिधी) अकोले सार‘या मोठया खेडयातील क‘ीडापटू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवतात ही बाब अकोलेकरासाठी अतिशय अभियान ची बाब आहे. असे प्रतिपादन प्रतिययश उद्योजक नितीन गोडसे यांनी केले. ते कि‘एटीव्ह आटस्‌ ऍकेडमी व रुद्रा जनहित प्रतिष्ठाणच्या वतीने योगा व बुध्दीबळ या क‘ीडा प्रचारात श्रीलंके’ध्ये कोलंबो येथे दक्षिण आशियाई स्टुडंट ऑल्मीपियाट स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्याचा जाहिर सत्कार पॉलीटेक्नीकच्या प्रांगणात आयोजित केला होता. त्यावेळी बोलत होते कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्ुकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे.डी. आंबरे पा. होते. या गौरव सत्कारसमारंभास अर्यवेद पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा.बी.एम. महाले, सौ.मनिषा गोडसे, क‘ीडा प्रशिक्षक दिलीप झोळेकर, जेष्ठ पत्रकार प्रा.डी.के.वैद्य, पालक व नागरिक मोठ्या सं‘येने उपस्थित होते. श्री. गोडसे पुढे म्हणाले की, अकोले सार‘या ठिकाणी कोणतीही अत्याधुनिक सुविधा, तंत्र, मार्गदर्शक नसतांना जिद्द व चिकाटीच्या जोरावर कु. अश्विनी काळे, कु.प्रियंका दुटे, सौ.पूजा बिन्नर व अर्शद पठाण यांनी सुवर्णपदक मिळविले. एकेकाळी महिनाभर चालु असलेल्या ऑलंम्पीक स्पर्धेत सुवर्णपदकाची संपूर्ण भारत देश पहात होता. अशा परिस्थितीत अकोलेच्या विद्यार्थ्यांनी मानाचा तुरा खोचला ही बाब अभिमानाची आहे. अर्शद पठाण सारखा विद्यार्थी बुध्दीबळ स्पर्धेत कोणाचेही मार्गदर्शन न घेता एकलव्यासारखे मोबाईल ऑनलाईन व मित्रांनी पाठविलेल्या पुस्ताकातुन स्वत: शिकत आहे. हे यश संपादन केलेे. त्याला जर योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळाले तर तो भविष्यात देशाचे नांव उज्वल करीन. तच मदतीसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केलेे. अध्यक्षीय मनोगतामध्ये जे.डी. आंबरे पा.म्हणाले की, या क‘ीडापटुंचा सत्कार व त्यांचा गौरव नसुन संपूर्ण तालुक्याचा गौरव आहे. कॉलेज सुरु झाल्यानंतर या सुवर्णपदक विजेत्यांचा सत्कार संस्थेमार्’त करणार आहे. ऍकेडमीने सत्काराची नामी संधी साधली त्याबद्दल त्यांचे कौतुळ करीतो. अकोले एज्ुकेशन सोसायटी ही सामाजिक भावनेतुन काम करीत असुन ती मागे रहाणार नाही असे अश्वासन दिले. प्रा.बी.एम महाले म्हणाले की, सोनं चिंधीत बांधले म्हणुन त्याचे मूल्य कमी होत नाही. विद्यार्थ्यांमधील टॅलेंट ही बाब तशिच आहे. त्यामुळे संधीचे सोने करणार या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. ऍकेडमीचे अध्यक्ष लक्ष्मण आव्हाड म्हणाले की, या सुवर्णपदक विजेत्यांचा सत्कार मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. त्यांचा देशाला अभिमान आहे. कला, क‘ीडा, सांस्कृतिक व साहित्यीक क्षेत्रासाठी समाजाने पाठबळ दयावे. यावेळी सत्कारमूर्ती अश्विनी काळे म्हणाली की, श्रीलंकेतील विजयाचा आनंद जेवढा होता, त्यापेक्षाही मातीने केलेला हा सत्कार मोठा मोलाचा आहे. यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे आवडीच्या क्षेत्रात करीअर करावे. यावेळी अश्विनी काळे, पूजा बिन्नर, प्रियंका दुटे व अर्शद पठाण यांनी श्रीलंकेतील स्पर्धेतील अनुभव सांगितले. आई वडीलांचे परिश्रम, पाटबळ, क‘ीडा पशिक्षकाचे मार्गदर्शन यांना आम्ही सुवर्णपदक अर्पण करीत आहोत, या सत्काराने आम्ही सर्वजन भारावुन गेलो, असे सांगितले. सुवर्णपदक विजेत्यांचा मान्यवरांचे हस्ते शाल, गुच्छ, व मानपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. मानपत्राचे वाचन चंद्रविलास गव्हाणे यांनी केले. योगा प्रशिक्षक दिलीप झोळेकर नृत्य प्रशिक्षीका अर्चना जाधव, स्मिताताई मुंदडा यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. स्वागत सचिन शिंदे यांनी केले. प्रास्ताविक सुभाष खरबस यांनी केले तर सुत्रसंचालन भाऊसाहेब कासार यांनी केले. आभार प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी मानले. कार्यक‘माच्या यशस्वीतेसाठी दत्ता नवले, रोहिदास धुमाळ, विशाल पगारे, अमोल आरोटे, यांनी परिश्रम घेतले.