अवश्य वाचा


  • Share

कर्जमाफी देत नसल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात फिर्याद

नगर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी न देता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. असा आरोप करणारी खासगी फिर्याद जिल्हा न्यायालयात देेण्यात आली. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत बाबुराव पाटील यांनी वकिलामार्फत ही फिर्याद दिली. ज्यात म्हटले आहे, विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कर्जमाफी केल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील, याची हमी काय? त्यानंतर सरकार कर्जमाफी देणार नसल्याचे उघड झाले. औरंगाबाद जिल्ह्यात विष्णू बुरकुले या शेतकर्‍याने आत्महत्या केली. इतर ठिकाणीही शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यांना मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवावा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांंकडे ही फिर्याद दिली. 9 मेला सुनावणी होणार आहे.