अवश्य वाचा


  • Share

रोटरी फाऊंडेशनला एका लाख रुपयांची देणगी

संगमनेर (प्रतिनिधी) केंद्र व राज्य शासन वेगवेगळ्या माध्यमातून डिजिटल क्रांतीच्या दिशेने पावले टाकत असतांना महाराष्ट्र राज्यातील 18 हजार 810 शाळा डिजिटल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने रोटरी साऊथ एशिया सोसायटीशी नुकताच सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे रोटरीच्या साक्षरता मिशन कार्यक्रमांतर्गत लवकरच महाराष्ट्रातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या जवळपास सर्वच शाळा डिजिटल होणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात गरीब-श्रीमंतीची दरी अधोरेखित होत असतांना रोटरीचे सामाजिक योगदान शिक्षणक्षेत्रात सुवर्णाक्षरांनी नोंदविले जाईल असे प्रतिपादन प्रमोद पारीख यांनी केलेे. येथील रोटरी क्लबतर्फे देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या रोटरी जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी रोटरी जिल्हा 3132 चे प्रांतपाल प्रमोद पारीख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष सुनील कडलग तर व्यासपीठावर उपप्रांतपाल राजेंद्र कोते, सचिव साईनाथ साबळे उपस्थित होते. जगभर सामाजिक कार्यासाठी रोटरी इंटरनॅशनल या संस्थेला निधी पुरविणार्‍यां रोटरी फाऊंडेशनला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संगमनेर रोटरी क्लबतर्फे एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. रोटरीच्या हार्मनी या विषेशांकाचे प्रकाशन प्रांतपाल प्रमोद पारीख यांच्या हस्ते करण्यात आले, हार्मनी संपादक ओंकार सोमाणई याप्रसंगी उपस्थिती होते. प्रांतपाल प्रमोद पारीख यांनी रोटरी अध्यक्ष सुनील कडलग यांचेकडून हा निधी स्विकारला या प्रसंगी रोटरी क्लबतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा रोटरी जीवगौरव पुरस्कार येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बद्रीशेठ चांडक व नांदुरखंदरमाळ येथील सुनंदाताई गहिनाजी भागवत शैक्षणिक ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा सुनंदाताई भागवत यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या प्रदिर्घ व अभ्यासपूर्ण भाषणात प्रांतपाल प्रमोद पारीख पुढे म्हणाले की, रोटरी क्लब संगमनेरने या वर्षभरात राबविलेले सर्वच प्रकल्प सामाजिक भान जपणारे असून संगमनेर रोटरी क्लब त्यांच्या सामाजिक कार्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात अव्वल ठरला आहे. भविष्यातही रोटरी सदस्यांनी हे सामाजिक भान जपावे असा आशार्वाद त्यांनी व्यक्त केला. पुरस्कारविजेते बद्रीशेठ चांडक यांनी याप्रसंगी रोटरी आय केअर ट्रस्टला 11 हजार रुपयांची देणगी दिली, सुनंदाताई भागवत सत्काराला उत्तर देतांना म्हणाल्या की, उपेक्षित व वंचित मुली सांभाळतांना मी त्यांची आई झाले. या मुलींनी मला जेवढे प्रेम दिले ती माझ्या जीवनातील खरी श्रीमंती आहे. या सामाजिक कार्याच्या शिदोरीमुळेच माझे आयुष्य समृद्ध झाले आहे. या प्रसंगी आनंदी रस्ते उपक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेचे विजेते बाळासाहेब पिंगळे (प्रथम), मुरारी देशपांडे (द्वितीय), सुभाष कर्डक (तृतीय), संजय पेटकर व सुभाष पवार यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी मनोहरबाबा विद्यालय सायखिंडी डिजिटल प्रकल्प राबविण्यासाठी देणगी देण्यात देणार्‍या तुषार विलास गोंदकर (शिर्डी) यांचा सत्कार प्रांतपाल प्रमोद पारीख यांच्या हस्ते करण्यात आला. पाहुण्यांचे परिचय प्रितेश पोफळे यांनी करवून दिला. सन्मानपत्राचे वाचन दीपक मणियार, भारतभूषण नावंदर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन पलोड यांनी तर आभारप्रदर्शन सचिव साईनाथ साबळे यांनी केले.