अवश्य वाचा


  • Share

कर्जमाफीसाठी शेतकर्‍याचे विहीरीत उपोषण सुरूच

अकोले(प्रतनिधी) शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी, आपली शेतजमिन जप्त करू नये या मागणीसाठी तालुक्यातील मन्याळ येथील शेतकर्‍याने कोरड्या विहिरीत सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असुन या उपोषणावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने हे उपोषण सुरूच आहे. मन्याळ येथील भैरवनाथ जाधव या शेतकर्‍याने एका पतपेढीकडून कर्ज घेतले होते. मात्र नापिकी, दुष्काळ, शेतमालाचे घसरलेले दर यामुळे त्यांना हे कर्ज फेडता आले नाही. पयार्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. अखेर पतपेढीने जमिन जप्तीची नोटीस पाठविल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍याने आपल्या कोरड्या विहीरत विषाची बाटली घेऊन उपोषणाला सुरूवात केली आहे. प्रशासनाने समजुत घातली मात्र, जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यत उपोषण मागे न घेण्याचा निर्णयावर जाधव हे ठाम आहे.