अवश्य वाचा


  • Share

प्रधानमंत्री उज्वला योजना महिलांसाठी फायदेशीर- होडगर

संगमनेर (प्रतिनिधी) गरीब महिलासाठी उज्वला गॅस योजना सुरु केल्यामुळे या महिलाच्या अडचणी कमी होत महिलाचे आरोग्य सुधारण्यास यामुळे मदत मिळणार असल्याने ही योजना महिलांसाठी फायदेशीर असल्याने या योजनेसाठी महिलांनी व आपण सर्वांनी पंतप्रधान नरंेंद्र मोदी याचे आभार मानले पाहिजे असे गौरवउद्गार मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक शाळीग्राम होडगर यांनी काढले आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे बुधवार 4 मे रोजी आयोजित प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत परिसरातील सुमारे 185 गरजु महीलांना एलपीजी गॅस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आश्वी ग्रामपंचायत सदस्य विजयराव हिंगे, भाऊसाहेब गायकवाड, बाळकृष्ण होडगर, आबासाहेब राखपसरे, सतिषराव गोडंगे, बाळासाहेब गायकवाड, प्रशांत कोळपकर, माऊली गॅसचे वितरक नवले, अँड. स्मिता कोळपकर, अनिल राखपसरे, मंच्छिद्र होडगर, राहुल जर्‍हाड, जगन्नाथ हिंगे, संतोष ताजणे, सिताराम गायकवाड, अमोल राखपसरे आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी होडगर म्हणाले कि, ग्रामिण भागातील दारिद्र रेषेखालील कुटुंबातील महिलांना गरीबीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह व पालनपोषण करण्यासाठी अतिशय तुटपुंज्या मंजुरीवर काम करावे लागत असल्याने महागाईचे चटके सोसत असताना गॅस घेणे हे या कुटुंबाच्या अवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे या महिलांना मातीच्या अथवा तीन दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. चुलीवर स्वयंपाक करताना निघणार्‍या धुरामुळे महिलाचे आरोग्य हे धोक्यात येत असल्याने महिलाना विविध दर्धर आजाराना सामोरे जावे लागत असते मात्र या योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. युवा कार्यकर्ते विजय हिंगे म्हणाले कि, आ.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने गोर - गरिबांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. आश्वीसह परिसरातील उंबरी-बाळापूर, दाढ, खळी आदि गावातील दारिद्र रेषेखालील सुमारे 185 लाभांर्थी गरीब कष्टकरी महिलांना मान्यवरांच्या हस्ते एलपीजी गॅस कनेक्शन वितरण करण्यात आले आहे. तर गॅस मिळाल्याने या महिलाची धुरापासून सूटका झाल्यामुळे या महिलाच्या चेहर्‍यावरील आनंद यावेळी ओसडून वाहत होता. हा आनंद आणखी काम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.