अवश्य वाचा


  • Share

बुद्ध पोर्णीमानिमित्त ज्येष्ठ साहित्यक बाबुराव गुरव यांचे संगमनेरात व्याख्यान

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये भगवान गौतमबुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती महोत्सव समितीचे प्रमुख संयोजक रवींद्र पटेकर यांनी दिली. संयुक्त जयंती महोत्सव समितीचे हे अठरावे वर्ष असून - 10 मे रोजी रात्री 8.00 वाजता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीरजी तांबे यांचे अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील जेष्ठ साहित्यक व विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.बाबुराव गुरव, तासगाव जिल्हा- सांगली यांचे बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर- एक मुक्त चिंतन या विषयावर तर, प्रा.डॉ. रत्ना वाघमारे, अहमदनगर यांचे बुद्धम शरणं गच्छामी या विषयावर व्याख्यान होणार आहे. सांयकाळी सात वाजता प्रा. श्रीकांत माघाडे व सहकारी यांचा चळवळीतील प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शाहू-फूले-आंबेडकर चळवळीतील जेष्ठ नेते अशोकराव गायकवाड, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, नाशिक विभागाचे सहायक शिक्षण संचालक दिलीप गोविंद, माधामिक विभागाचे शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पोले, एस.जी मंडलिक नाशिक, कृषी व पशु-संवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, जि.प. सदस्य सीताराम राउत, प्रा. डॉ. सुधाकर शेलार, प्रा.डॉ. महेबूब सय्यद, विलास साठे, माणिकराव यादव, उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त जयंतीचे अध्यक्ष प्रवीण गवांदे, उपाध्यक्ष अनिल गायकवाड, सचिव दिलीप बर्डे, विश्वनाथ अल्हाट, चंद्रहार मोकळ, आबासाहेब धाकतोडे, के.सी.बागुल, भाऊसाहेब गोरे, सुखदेव इल्हे आदींनी केलेे आहे.