अवश्य वाचा


  • Share

संशोधन क्षेत्रात करीअर करण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांनी बघावे - सौ. तांबे

संगमनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोठे-घारगांव सारख्या दुर्गम भागातील निता भालके हिने अग्निपंख हे ए.पी.जे. अब्दुल कलामांचे प्रेरणादायी पुस्तक वाचले आणि त्यातून प्रेरणा घेवून ग्रामीण भागातील निता भालके शास्त्रज्ञ झाली. इस्त्रोच्या मंगळयानात सहभागी झालेल्या कु.निता भालकेचा हा इतिहास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. रोटरी संडे सायन्स स्कूलपासूनही अशाची प्रेरणा घेवून भविष्यात संशोधन क्षेत्रात करीअर करण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांनी बघावे असे प्रतिपादन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केली. येथील रोटरी क्लब संचलिक रोटरी संडे सायन्स स्कूलतर्फे चालविल्या जाणार्‍या रोबोटिक्स- तंत्र व मं या तीन दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर श्री व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा संज्योत वैद्य, रोटरीचे सचिव साईनाथ साबळे, संडे सायन्स स्कूलचे डायरेक्टर प्रा.शरद तुपविहिरे, प्रकल्पप्रमुख पवनकुमार वर्मा, रोटरी आय केअर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप मालपाणी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष सुनील कडलग उपस्थित होते. याप्रसंगी संगमनेर नगरपरिषदेला महाराष्ट्र शासनाचा दोन कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांचा रोटरीतर्फे सत्कार करण्यात आला. आपल्या प्रास्तविक भाषणात प्रकल्पप्रमुख पवनकुमार वर्मा यांनी कार्यक्रमामागचा हेतू विषद केला. आपल्या भाषणात श्री व्यंकटेश एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा संज्योत वैद्य म्हणाल्या की, दैनंदिन जीवनात विज्ञानाता वापर होत असतांना चौकस विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरे शिक्षक-पालकांनाही देता येत नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घरातील स्मार्ट फोनवरील गुगल दादांना हे प्रश्न विचारावेत. यातून भविष्यातील आईनस्टाईन निर्माण होतील. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासुवृत्तीला रोटरी संडे सायन्स स्कूलच्या माध्यमातून मिळणार्‍या प्रोत्साहनाबाबत त्यांनी रोटरी क्लबचे कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील कडलग यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यांची सिमारेषा पुसट असली तरी ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न रोटरीने केला आहे. या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टी असणारा नागरीक निर्माण होईल असे सांगीतले. भविष्यात रोबोटिक्स क्षेत्रात करीअरच्या खूप संधी आहेत. या क्षेत्राची आवड विद्यार्थ्यांना लागावी म्हणूनच रोटरीने या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगीतले. प्रा.शरद तुपविहीरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केलेे. या प्रसंगी रोटरी संडे सायन्स स्कूलमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजित काकडे यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिव साईनाथ साबळे यांनी केले.