अवश्य वाचा


  • Share

मार्केट कमिटीच्या थंड जलसेवेने सुखावले शेतकरी

संगमनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने एक वर्षापुर्वी सुरु केलेल्या थंंड व शुध्द जलसेवेचा उपयोग शेतकर्‍यांना फार मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतकरी केंद्रबिंदु माणून त्यांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी संगमनेर बाजार समितीचा सतत प्रयत्न असतो. फक्त एक रुपयात एक लीटर शुध्द व थंड पाणी मिळत असल्याने शेतकरी, व्यापारी, मापाडी, हमाल, वाहतुकदार यांना फार मोठा दिलास मिळत आहे. एप्रील-मे महिन्यात तप्त उन्हात वावरताना थंड पाणी पिण्यास मिळणे हे समाधान फार मोठे आहे, उद्गार या सेवेचा लाभ घेणारे शेतकरी-हमाल-मापडी व्यक्त करीत आहेत. दररोज किमान 2500 लीटर पाणी नागरिकांना वाटप होते. त्यासाठी स्वतंत्र मशिनरी बसविल्याने बाजार समितीला भेट देणारे नागरिक धन्यवाद देत आहेत, अशी माहीती सभापती शंकरराव खेमनर, उपसभापती सतिषराव कानवडे, सचिव सतिषराव गुंजाळ यांनी दिली आहे.