अवश्य वाचा


  • Share

कै.सुधाताई अप्पासाहेब पाटील यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

सांगली (प्रतिनिधी) असोसिएशन ऑफ स्मॉल मिडीयम न्युज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी सौ. सुधा आप्पासाहेब पाटील यांचे दि 17/4/2017 रोजी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने दु;खद निधन झाले . संघटनेच्या वतीने सांगली येथील कामगार भवन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सचिव अजित म्हात्रे होते. यावेळी काही सदस्य व पदाधिकारी यानी सौ. सुधाताई आप्पासाहेब पाटील यांच्या विषयी आदरयूक्त भावना व्यक्त करुन आदरांजली वाहिली. याच सभेत सांगली येथील साप्ताहिकाचे संपादक विजय गोरे यांच्या मातोश्रीं सुमती गोरे यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.पाटील व गोरे कुटूंबीयांच्या दुःखात ही संघटना सहभागी असुन हे दु:ख सहन करण्याची ईश्वर त्याना शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. या शोकसभेस राज्य सचिव गोरख तावरे, अण्णासाहेब नाईक, बाळासाहेब आंबेकर, यशवंत कुंभार, यशवंत गायकवाड, बाळासाहेब साळुंखे, भीमराव ऊल्हारे, राजेश बिराजदार, विक्रमसिंह पवार, शरदकुमार कुलथे, संपत देसाई, आनंद लोके, हर्षवर्धन धारणकर, अनिल आपटे, राहुल पाटील, विजय गोरे, यांच्या सह संघटनेचे अनेक पदाधिकारी व सदस्य या शोक सभेला हजर होते. दैनिक युवावार्ता व संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई च्या वतीने कै. सुधा पाटील व सुमती गोरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली!