अवश्य वाचा


  • Share

शारदा पतसंस्थेच्या चेअरमनपदी मनिष मनियार तर व्हा. चेअरमनपदी कैलास राठी यांची निवड

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्याच्या पतसंस्था चळवळीत अग्रणी असलेल्या शारदा पतसंस्थेच्या चेअरमनपदी मनिष मनियार यांची तर, व्हा. चेअरमनपदी कैलास राठी यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात संचालकांच्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. निवडीनंतर बोलतांना श्री.मनियार यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. सभासद व ग्राहकांनी मोठ्या विश्वासावर संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेले आहे. हा विश्वास कायम ठेवतांना संस्था, सभासद व ग्राहक यांच्या हितासाठी सतत कार्यमग्न राहण्याचा निश्चय त्यांनी केला. कैलास राठी यांनी मोठ्या संस्थेचे पद केवळ भूषण नसून मोठी जबाबदारी असल्याचे सांगीतले. पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा या जोरावर शारदाने गरुड भरारी घेतली आहे. संस्थेचा प्रगतीचा आलेख असाच चढ्याक्रमाने कायम ठेवण्यासाठी संचालक मंडळासोबत प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले. शारदा पतसंस्थेचे नाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात आघाडीवर आहे. आजमितीस संस्थेत सुमारे एकशे चार कोटींच्या ठेवी असून 62 कोटी 47 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेचे खेळते भागभांडवल एकशे पस्तीस कोटी 56 लाख रुपये आहे. संस्थेच्या वसुली विभागाने परिश्रम करीत थकबाकी अवघ्या 3.79 टक्क्यांपर्यंत ठेवण्यात यश मिळविले असून गेल्या आर्थिक् वर्षात संस्थेला 3 कोटी 61 लाख रुपयांचा विक्रमी र्नेंा झाला आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी झालेली पदाधिकारी निवड प्रक्रीया सहकार उपनिबंधक विभागाच्या प्रथमश्रेणी अधिकारी श्रीमती पी. एन.सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी सभासद मनिष मालपाणी, डॉ. राजेंद्र जे. मालपाणी, राजगोपाल उपाध्ये, रविंद्र तवरेज, बसंत मनियार, नितीन लाहोटी, राजगोपाल बंग, श्रीकांत कासट, सुनील दिवेकर, श्रीनाथ राठी आदींसह संस्थेचे संचालक राजकुमार र्पोेंळे, विशाल पडताणी, राजेश रा.मालपाणी, सुरेंद्रकुमार कासट, उमेश झंवर, डॉ.योगेश भुतडा, अमर झंवर, सागर वाकचौरे, प्रतिमा चांडक, सोनाली नावंदर, जगदिश टोकसे, सोमनाथ कानकाटे, तज्ज्ञ संचालक लक्ष्मीनारायण पलोड, संकेत कलंत्री, व्यवस्थापक माधव भोर, शाखा व्यवस्थापक विलास सांगळे आदींसह मान्यवर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.