अवश्य वाचा


  • Share

लिहिलेल्या, खराब, मळक्या, फाटक्या नोटा बँका स्विकारणार

संगमनेर(प्रतिनिधी) नजरचुकीने आपल्याकडे आलेल्या खराब नोटा, लिखाण केलेल्या नोटा, मळक्या व ङ्ग ाटक्या नोटामुळे आता घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण या नोटा बँकेत घेतल्या जाणार आहे. या खराब नोटा स्विकारण्याबाबतचे निर्देश नुकतेच आरबीआयने सर्व बँकाना दिले आहेत. नोटांवर लिहीण्याची अनेक बँकांच्या कर्मचार्‍यांनाच सवय असते. सर्वसामान्य माणुस शक्यतो नोटांवर काही लिहीत नाही. मात्र बँकाच्या कर्मचार्‍यांनी नोटांवर लिहीण्याची सवय सोडावी यासाठी आरबीआयने बँकाना काही निर्देश दिले होते. मात्र बँकानी त्याचा चुकीचा अर्थ लावत ग्राहकांकडून या लिहिलेल्या नोटाच स्विकारणे बंद केले होते, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचा मोठा आर्थिक ङ्ग टका बसला. अनेकांकडे 2000,500व 100 रुपयांच्या लिहीलेल्या व खराब झालेल्या नोटा पडून आहेत. या नोटा कशा व कुठे कटवायच्या असा प्रश्‍न त्यांना पडला होता. मात्र आता सर्व बँकाना या नोटा स्विकारण्याचे निर्देश दिले गेले असल्याने सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान ग्राहकांकडून खराब नोटा स्विकाराव्यात व पुन्हा त्या नोटा त्यांना देऊ नयेत असेही निर्देश या बँकाना देणात आले आहेत.