अवश्य वाचा


  • Share

उद्योजक रविंद्र बिरोेले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

साकूर (प्रतिनिधी) पुण्यातील प्रसिध्द उद्योजक व संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नंदनवन फुलविण्याचे स्वप्न मनाशी बाळगून युटेक शुगर साखर कारखान्याची निर्मिती करणारे रविंद्र बिरोले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसावर होणारा हजारो, लाखो रूपयांच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन उद्योजक रविंद्र बिरोले यांचा 48 वा वाढदिवस उत्साहात व कौठे मलकापूर येथे विविध सामाजिक व लोकपयोगी उप्रकम राबवून साजरा करण्यात आला. यात युटेक शुगर कारखान्याचे कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या वतीने पुर्वीच्या झालेल्या शासकीय बंधार्‍यामध्ये साचलेला गाळ काढून तो शासकीय जमिनीवर टाकून वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. मागील वर्षीही कौठे मलकापूर येथील साठवण तलावातील साचलेला गाळ काढून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. साठवण तलावातील गाळ काढून तसेच गावातील ओढे नालेही जेसीबीच्या साह्याने स्वच्छ करून पाण्याचे पुर्नभरण होण्यासाठी विदोष प्रत्यक्ष करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच हरीभाऊ गिते, सुकदेव गंभीरे, तुळशीराम परचंडे, लक्ष्मण गिते, मच्छिंद्र बर्डे, कैलास डोंगरे, बालू शेख, मच्छिंद्र पवार, विलास बागुल, तान्हाजी बागुल, युटेक शुगरचे अधिकारी श्री. खरडे, सोहन वाघ, श्री. जाधव, श्री. मंडलिक, श्री. गुळवे, नवनाथ गंभीरे, श्री. डहाळे, रामदास बारवे, गणेश डोंगरे व इतर कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.