अवश्य वाचा


  • Share

जेईई मेन्स 2017 परिक्षेमध्ये मनाली बजाज जिल्ह्यात प्रथम

संगमनेर (प्रतिनिधी) दि.2 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परिक्षा जेईई मेन्स 2017 मध्ये संगमनेर येथील कु.मनाली दिपक बजाज हीने 198 गुण मिळवून अहमदनगर जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. सदर परिक्षा एन.आय.टी., आय. आय. टी. सह विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेतली जाते. या परिक्षेसाठी देशातील 13 लाख विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये मनालीने 8999 वा क्रमांक मिळवला. यानंतर आयआयटीच्या प्रवेशासाठी 21 मे रोजी जेईई अ‍ॅडव्हान्स परिक्षा घेण्यात येणार असुन त्यामध्ये चांगला क्रमांक मिळण्यासाठी ती प्रयत्न करत आहे. या यशासाठी मनालीला आई-वडिल,इम्पल्स क्लासेसचे डॉ.वाघमोडे सर व प्रा. इम्रान सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रोज नियमितपणे 8 ते 10 तास अभ्यास केल्यामुळे तिला हे यश मिळाले. यासाठी तिने छउएठढ च्या पाठ्यपुस्तकांचे अनेकवेळा वाचन केले व त्यानंतर प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव केला. मनालीचे वडील हे अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत तर आई सौ.वैशाली बजाज या गृहिणी आहेत. तिच्या या यशाबद्दल राज्याचे माजी महसुलमंत्री आ.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, अमृतवाहिनीच्या संचालिका सौ.शरयुताई देशमुख, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेतील सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने तिचे अभिनंदन केले.