अवश्य वाचा


  • Share

अन्न सुरक्षा दक्षता समितीत विविध ठराव पारीत

अकोले (प्रतिनिधी) अन्न धान्य वाहतूक एक किलोमीटर पेक्षा जास्त नको. शिलकी धान्याची नोंद ’लकावर केली जावी. रॉकेलचा 100 टक्के कोटा आगामी काळात उपलब्ध केला जावा. गॅस धारकाला गॅस सिलेंडर वाहतुकीला 7 किलो मीटरची मर्यादा घातली जावी. रॉकेलचा कोटा गॅस धारकालाही दिला जावा. हे व अन्य ठराव आज दुपारी तहशील कार्यालयात झालेल्या बैठकीत पारीत केले गेले. अन्न धान्य दक्षता समितीची आज दुपारी बैठक झाली.आ.वैभवराव पिचड बैठकीच्या अद्यक्षस्थानी होते. तर सभापती रंजना मेंगाळ, उप सभापती मारुती मेंगाळ, नगराद्यक्ष के.डी.धुमाळ, गट विकास अधिकारी सुमीत पाटील, तहशीलदार मनोज देशमुख हे मान्यवर व्यासपीठावर होते. आ.पिचड यांनी प्रत्येक विभागाची माहिती घेतांना तहशीलदार व पुरवठा अधिकार्‍यांना धारेवर धरले. शिवाय गरीबांना दिल्या जाणार्‍या धान्याला घोटी मार्गे कसे पाय फुटतात. असा सवाल करून व इतर प्रश्‍न विचारून प्रशासनाला बॅक फुटवर जाण्यास भाग पाडले. मागणी पत्रकाप्रमाणे माल पुरवला जातो. पण शिलकी धान्य कुठे गायब होते. असा तिरकस सवालही त्यांनी केला. अन्नधान्य दप्तराची दर महिन्याला तपासणी झाली पाहिजे.अशी मागणी यावेळेस केली गेली.तर दारिद्र्य रेषेखालील लाभधारकांना नव्हे तर बड्या व धनदांडग्यांना धान्य मिळते.व गरजू मात्र त्यापासून वंचित राहतात.असे डॉ.शरद तळपाडे, डॉ.विजय पोपेरे, आदीनी लक्षात आणून दिले. त्यावर तहशीलदार देशमुख यांनी ग्राम सभेकडे बोट दाखवले. तर आ.पिचड यांनी या लाभधारकांची यादी तलाठ्यांमार्फत तपासली जावी. अशी सूचना केली. गॅस पाँइंटवर बोलतांना पिकअप आ.पिचड यांनी किमान 7 किलो मीटर पर्यंतच वाहतूक गॅस धारकाला करण्याची वेळ यावी अशी मागणी केली. व तसा ठरावही मंजूर करवून घेतला. वीज भार नियमनावरही यावेळेस के.डी.धुमाळ,शिवाजी नेहे, विनोद हांडे, योगेश नाईकवाडी, नितीन जोशी आदींनी संताप व्यक्त केला. रात्री 2 वाजता वीज प्रवाह सोडून वीज वितरण कंपनी शेतकरी वर्गाची मुस्काटदाबी करीत आहे.असे यावेळेस ते म्हणाले. कुपोषीत बालकांचा प्रश्‍न डॉ. पोपेरे यांनी उपस्थित केला. शिवाय बीपीएल धारक जर विभक्त झाले तर ते एपीएल धारक कसे होतात.हा सवाल उपस्थित केला गेला. त्यावर आ.पिचड यांनी अशा कुटूंंबांचे विभक्तीकरण झाले तरीही त्यांना केशरी कार्डच दिले जावे.असा ठराव पारीत करण्यास तहशीलदारांना सांगितले. रेशन कार्ड धारकाला केशरी शिधापत्रिकाच दिल्या जाव्यात.अंत्योदय योजना, पिवळे कार्ड धारक, केशरी कार्ड धारक व गॅस, रॉकेल ,व अन्य पुरवठ्याबाबत यावेळेस सविस्तर चर्चा झाली.