अवश्य वाचा


  • Share

कोकणे परिवाराच्या दानशिलतेतून उभा राहिला आदर्श- डॉ.सुधीर तांबे

संगमनेर (पतिनिधी) संगमनेर मधील कोकणे परिवारच्या दानशिलतेतून संगमनेर महाविद्यालयाच्या आवारात अभे राहिलेले श्री गणपतसा कोकणे उद्यान हे एक आदर्श उदाहरण आहे. असे प्रशंसोद्गार आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी येथे काढले. शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक एकराच्या प्रांगणात सुंदर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. श्री. विजय, प्रकाश, व दिलीप कोकणे व रविंद्र पवार यांच्या दानतून या उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. श्री.गणपतसा कोकणे यांच्या स्मृतीत उभारलेल्या या उद्यानाचे नामकरण व उद्घाटन आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना त्यांनी वरील उद्गार काढले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, डॉ.सोमनाथ सातपुते उपस्थित होते. आमदार डॉ.तांबे म्हणाले की आपल्या प्रियजनांच्या स्मृती चिरंतर करण्यासाठी अशा प्रकारचे दान देणे ही मनाच्या समाधानासमवेत काळाचीही गरज आहे. कोकणे परिवारातील प्रत्येक व्यक्ती प्रसन्नतेचा शिडकावा करणारी आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात हे उद्यान उभारुन विद्यार्थी व प्राध्यापकांच्या मनात प्रसन्नता निर्माण करण्यात या उद्यानाचा मोठा वाटा असेल. याप्रसंगी व्यासपीठावर कोकणे परिवारातील रत्नाकरसा पवार, विजय कोकणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना शि. प्र.संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी कोकणे परिवाराच्या योगदानाची माहिती दिली. सचिव अनिल राठी यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष श्री.बिहारीलाल डंग यांच्या हस्ते दानदात्यांचा सन्मान करण्यात आला. जनरल सेक्रेटरी सीए नारायण कलंत्री यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कोकणे परिवार, शि.प्र.संस्थेचे खजिनदार प्रकाश बर्डे, बांधकाम समिती अध्यक्ष राजकुमार गांधी, विश्‍वस्त मधुशेठ गाडे, डॉ.ओमप्रकाश सिकची, प्रकाश क्षत्रीय व संगमनेरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.