अवश्य वाचा


  • Share

वादळी वार्‍याने पठार भागात अनेक घरांची पडझड पं.स. सदस्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पहाणी

संगमनेर (प्रतिनिधी ) रविवार दुपार नंतर संगमनेर तालुक्यातील पठार भागात वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने शेतातील पिकांचे, घरांचे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या असून पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांनी तात्काळ पठार भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यातच रविवारी दुपार पासूनच वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील पेमगिरी, हजारवाडी, पारेगांव बु, जांबुत,समनापूर, माळेगांव हवेली,घारगांव, कुरकुंडी, माळेगांव पठार, बोटा, आंबी दुमाला, केळेवाडी, नांदुरखंदरमाळ,जोर्वे, मालुंजे, वाघापूर, नांदुरी दुमाला येथे वादळी वार्यासह पाऊस पडल्याने शेतीचे , फळबागांचे घरांचे, गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात अनेकांच्या घरावरील पत्रे, कवले, उडून गेले. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. या पार्श्‍वभुमीवर सोमवारी आ.बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला व पदाधिकार्‍यांना नुकसानग्रस्त भागाला भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी करुन तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहे.यानुसार सभापती निशाताई कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, कृषी अधिकारी कारभारी नवले, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, अशोक गाडेकर आदींसह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नुकसान ग्रस्त भागाला समक्ष भेटी देवून पाहणी केली. व घरपडझडीमुळे जखमी झालेल्या नागरीकांची विचारपुस केली. तसेच नागरिकांनी घरे,गोठे तसेच शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली.