अवश्य वाचा


  • Share

महाराष्ट्र दिनापासून मोहिमेचा शुभारंभ- नगराध्यक्षा सौ. तांबे

संगमनेर (प्रतिनिधी) राज्यात वैभवशाली व प्रगत असणार्‍या संगमनेर तालुक्याला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरण मोहिमेचा शुभारंभ 1 मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. संगमनेर नगर परिषदेच्या वतीने सोमवार, दिंनाक 1 मे 2017 रोजी सकाळी 8 वा. महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाला. यावेळी उपनगराध्यक्ष नितीन अभंग, मुख्याधिकारी सचिन बांगर, नगरसेवक विश्‍वास मुर्तंडक, किशोर पवार, डॉ. दानिश शेळ, बाळासाहेब पवार,सौ. सुहासनी गुंजाळ, सौ. सुनंदा दिघे, सौ. सोनाली शिंदे, सौ. मेघा भगत आदींसह सर्व नगरसेवक व अधिकारी कर्मचारी,नागरीक, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर शहर स्वच्छ करण्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्या वतीने अनेक उपाय योजना करण्यात येत असून शहरातील नागरीकांनी शहर स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी व्हावे.दैनंदिन कचरा ओला व सुखा असे वर्गीकरण करुन कचरा घरच्या घरी जिरवण्याचे प्रयत्न करावे. घंटागाडीत कमीत कमी कचरा टाकावा. प्लॅस्टीक मुक्त करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्लॅटीक पिशवी वापरावर बंदी घालण्यात आली असून कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. संगमनेर शहर हे ऐतीहासीक सुसंस्कृत व सुरक्षीत शहर आहे. विकासातून अग्रेसर असलेल्या या शहराची वैभवशाली शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात दुष्काळ असतांना आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निळवंडे धरणातून थेट पाईप लाईन योजनेमुळे संगमनेरात सुरळीत पाणी पुरवठा होत आहे. विविध पार्क,रस्ते, इमारती, भूमीगत गटारींबरोबर बायपास, प्रवरा नदीवरील विविध पुलांची निर्मीती करण्यात आली आहे. स्वच्छ , सुंदर व हरित संगमनेर करण्यासाठी कचरा व्यवस्थापणासाठी ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला.