अवश्य वाचा


  • Share

संगमनेर पालीकेकडून अतिक्रमणाच्या नावाखाली बंद दुकानांची तोडफोड - व्यापार्‍यांमध्ये संताप

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहरात नगरपालीकेच्या वतीने नुकतीच अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली होती. मात्र आज सकाळी वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष सतिष आहेर यांचे बंद असलेले दुकाने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोणतेही पुर्वसुचना न देता जेसीबीच्या साह्याने तोडल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. दुकान बंद असतांना व काही दिवसांपूर्वीच अतिक्रमण हटविले असताना आजची ही कारवाई पुर्वग्रहदुषीत असून अनेक प्रश्‍न उपस्थित करणारीे आहे. दरम्यान बसस्थानकासमोर असणार्‍या छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांनी आपआपल्या दुकानांपुढील उन्हापासुन संरक्षण करणारे शेड काढुन टाकले व दुकानांसमोर असणार्‍या गटारीच्या मागे उन्हात उभे राहुन आपला व्यवसाय करत आहे. अशा पार्श्‍वभुमीवर पालीकेचे काही अधिकारी व कर्मचारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असुन जाणीवपुर्वक येथील व्यापार्‍यांना त्रास देत आहे. अतिक्रमण हटवितांना केवळ दुकानांवरील शेड काढण्याच्या सुचना पालीकेने संबधिताना दिल्या होत्या. त्यामुळे सर्वांनी शेड काढुन टाकल्या मात्र असे असतांना पालिकेच्या कर्मचार्‍यांनी आज गरज नसतांना येथील सतिष आहेर (निलकमल न्युज पेपर एजन्सी) यांच्या दुकानासमोरील गटारीवरील ढापे जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासुन या उघड्या गटारीसमोर बसुन येथील व्यापार्‍यांना आपला व्यवसाय करावा लागत आहे. दरम्यान काल एक मे महाराष्ट्र दिनानिमीत्त सर्व वर्तमान पत्रांना सुट्टी असल्याने आज मंगळवारी सतिष आहेर यांचे दुकान बंद होते. त्यामुळे तेथे अतिक्रमणाचा कुठलाही प्रश्‍न उपस्थित होत नव्हता अशा परिस्थीतीत पालिकेचे कर्मचारी राजु सुरग व इतरांनी आजुबाजुच्या चालु असलेल्या व अतिक्रमण केलेल्या इतरांकडे दुर्लक्ष करीत बंद असलेल्या दुकानाला जाणीवपुर्वक लक्ष करत जेसीबीच्या साहाय्याने दुकानाच्या शटरची तोडङ्ग ोड केली तसेच दुकानासमोरील पेपर विक्रीचा टेबल व बाकडाही तोडून टाकण्यात आला. त्यामुळे हि कारवाई पुर्वग्रहदुषीत असुन पालीका अधिकारी व कर्मचारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करुन जाणीवपुर्वक काही व्यापार्‍यांना त्रास देत आहे. दरम्यान दोन दिवसांपुर्वी शेजारील आठवण पोहे सेंटरचेही अतिक्रमण नसलेल्या बाकड्याचीही तोडङ्ग ोड करण्यात आली होती. रस्त्यापासुन 15 ङ्गु ट आत व दुकान चालु नाही त्यामुळे अतिक्रमणाचा कुठलाही प्रश्‍न नाही असे असतानाही तोडङ्गोड कशी करण्यात आली? असा सवाल सतिष आहेर यांनी विचारला असुन या प्रकरणाला जबाबदार असणार्‍या कर्मचार्‍यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. मात्र या कारवाईबाबत पालिकेकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. याबाबत सतिष आहेर यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेच्या संपुर्ण शहरातुन निषेध व्यक्त होत आहे.