अवश्य वाचा


  • Share

संगमनेरमध्ये चित्रीकरण झालेल्या कॉमेडीची बुलेट टे्रन रविवारी कलर मराठीवर

संगमनेर (प्रतिनिधी ) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाणता राजा मैदान येथे झालेल्या कॉमेडीची बुलेट ट्रेन हा लोकप्रिय कार्यक्रम रविवार दि. 30 रोजी सायं 6. वा कलर मराठी या वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा महोत्सव असलेल्या या जयंती महोत्सवात दरवर्षी आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये पुरस्कार वितरण, व्याख्याने, प्रबोधनपर मार्गदर्शन, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. यावर्षी कलर मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय असलेला कॉमेडीची बुलेट ट्रेन हा 25 दिग्गज कलावतांच्या उपस्थितीत व सुमारे 35 हजार नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेला भव्य दिव्य कार्यक्रम हा सर्वांच्या कुतुहालाचा विषय ठरला होता. या कार्यक्रमात मराठी सिनेअभिनेते सिध्दार्थ जाधव, अमृता खानविलकर, मानसी नाईक, मृण्मयी देशपांडे, विशाखा सुबेदार, मृण्मयी गोंधळेकर, सुशांत पुजारी, पुष्कर जोग, अरुण कदम, प्रभाकर मोरे, प्रसाद खांडेकर, संदिप गायकवाड, समीर चौगुले, अंशुमन विचारे, रेहित चव्हाण, योगेश शिरसाट, श्याम राजपुत, नम्रता आवटे, भक्ती रत्नपारखी, अनुपमा ताकमोडे, सुहास परांजपे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, निर्माता लेखक सचिन मोरे, कॅमेरामन शैलेंद्र राऊत, संगीतकार अमीर हडकर, कला दिग्दर्शक राकेश हांडे, वरिष्ठ कार्यकारी निर्माता प्रतीक कोल्हे, कार्यकारी निर्माता अमित दिक्षीत आदिंनी सहभाग घेतला होता. तरी हा कार्यक्रम रविवारी दि.30 रोजी सायं 6. वा कलर मराठी या वाहिनीवर दाखविला जाणार असून या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अमृत उद्योग समूह व जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.