अवश्य वाचा


  • Share

भगवान परशुराम जयंती निमित्त संगमनेरात भव्य शोभायात्रेचे आयोजन

संगमनेर ( प्रतिनिधी) येथील ब्राह्मण समाजाच्या वतीने शुक्रवारी अक्षय्यतृतीया आणि भगवान परशुराम जयंतीच्या निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ब्राह्मण युवा मंचचे अध्यक्ष व जयंती उत्सव समितीचे प्रकल्प प्रमुख संकेत मुळे, स्वप्नील उपासनी, तेजस्विनी बहुभाषक ब्राह्मण महिला मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष सौ. अंजली मुळे यांनी दिली आहे. ब्राह्मण प्रतिष्ठान, पुरोहित संघ, शहरातील सर्व भाषक ब्राह्मण संघटना व ब्राह्मण समाजबांधवांचा सहभाग असलेल्या या सोहळ्याची सुरुवात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील नवीन नगर रस्ता येथील पी.एन.गाडगीळ शोरूम पासून शोभायात्रेने होणार आहे. घोडेस्वार, उंट, चित्ररथ आदींचा समावेश असलेली ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चावडी, मेनरोड, सय्यदबाबा चौक, नेहरू चौक मार्गे ब्राह्मण बोर्डिंग पर्यंत जाणार आहे. ब्राह्मण बोर्डिंग येथे शोभायात्रेचा समारोप व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री., वैभव कुलकर्णी, निखील उपासनी, राजेश जोशी, भाऊ जाखडी, सौ. पूजा दीक्षित, सीमा सरा’, अरुंधती रेंगे, वैशाली कुलकर्णी,ए. टी. जोशी, मुकुंद मुळे, सुधाकर क्षीरसागर, अनिरुद्ध उपासनी, उमेश देशपांडे, गिरीश देशपांडे, विशाल कोरडे,संग्राम देशपांडे, शशांक गंधे, बापूसाहेब भाटे, नंदकिशोर बेल्हेकर, संदीप वैद्य, वैभव उपासनी, पंकज मुळे, सौरभ उमरजी, अमोघ कांबळे,अपूर्व देशपांडे,अजिक्य उपासनी, नितीन दीक्षित,अजिक्य बर्डे, अलोक बर्डेआदींनी केले आहे.