अवश्य वाचा


  • Share

फुले, आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

संगमनेर (प्रतिनिधी) शहरानजीक असणार्‍या डॉ. आंबेडकर नगर (घुलेवाडी ) येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त सोमवार दि. 1 मे. रोजी सांय 7 वाजता विविध कार्यक्रमाचे तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयुक्त जयंती सोहळ्याचे अध्यक्ष अरविंद सांगळे यांनी दिली. सोमवारी होणार्‍या या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संगमनेर नगरपालीकेच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे असणार आहे. तर या प्रसंगी प्रा. सुषमा अंधारे (जेष्ठ विचारवंत तथा प्रदेश सरचिटणीस भटक्या विमुक्त जमाती संघटना ) यांचे प्रमुख व्याख्यान होणार आहे. या सोहळ्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बी.आर. कदम. डॉ. माणिकराव शेवाळे, सेवानिवृत्त ए,सी.पी. राजदुत रूपवते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या कार्यकर्त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यात जेष्ठ समाज सेवक अजीजभाई शेख, चंद्रकांतजी पवार, मेजर लक्ष्मण ढोले, महिला चळवळीच्या कार्यकर्त्या सौ. शालनताई शेळके यांचा समावेश आहे. तर राजकीय क्षेत्रातील व विविध पदांवर नियुक्त झालेल्या मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे. यात शिक्षक नेते व नगरसेवक हिरालाल पगडाल, जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, जि.प. सदस्य सिताराम राऊत, प.स. उपसभापती नवनाथ अरगडे प.स. सदस्य सुनंदाताई जोर्वेकर यांना गौरविण्यात येणार आहे. संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने साजर्‍या करण्यात येणार्‍या या संयुक्त जयंती सोहळ्या निमित्त महाराष्ट्रातील अनेक प्रसिध्द वक्त्यांनी मार्गदर्शन केले आहे. यावर्षी प्रा. सुषमाताई अंधारे यांच्या या व्याख्यानासाठी व जयंती सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन समितीचे अध्यक्ष अरविंद सांगळे, कार्याध्यक्ष मिलींद सोणवने, सचिव राजीव साळवे, विशाल निळे, अनिल शेळके, डी.के.जमधडे, संजीवन साळवे सहित सदस्यांनी केले आहे.