अवश्य वाचा


  • Share

शेतकरी ते ग्राहक थेट द्राक्ष विक्री

व्यापार्‍यांचा चालबाजपणा व प्रचंड नफेखोरी तसेच बाजार समित्यांचे नियम व अटी तसेच अनावश्यक करवसुली यामुळे शेतकरी कायमच अडचणीत व तोट्यात येत असतो. परंतु या अडचणीवर मार्ग काढुन शासनाच्या नव्या धोरणानुसार काही द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी शेतकरी ते ग्रहाक अशी थेट द्राक्ष विक्री करून प्रचंड उत्पन्न मिळविले व इतर शेतकर्‍यांपुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे. सध्या द्राक्षांचा सिझन असुन व्यापार्‍यांकडील द्राक्षांना मोठी मागणी आहे. मात्र व्यापार्‍यांकडील द्राक्षांना मोठा भाव असल्याने सर्वसामान्यांना अजुनही हे द्राक्ष लागत आहे. तर शेतकर्‍यांनाही अत्यंत कमी दर दिला जात. असल्याने त्यांचा उत्पादन खर्चही भागत नाही. या पार्श्वभुमीवर सुनिल भडांगे (रा.निफाड) या शेतकर्‍याने सेंद्रिय पध्दतीने पिकविले थमसम जातीचे द्राक्ष काल पिकअप भरून संगमनेरात विक्रीसाठी आणले. नासिक पुणे महामार्गावर सह्याद्री हायस्कुल समोर ही गाडी उभी करूनव शेतकरी ते ग्राहक थेट द्राक्ष विक्री असा फलक लावुन 40 रूपये प्रतिकिलो या दराने द्राक्ष विक्री केली. या थेट विक्रिली शहरातील ग्राहकांनी उदंड असा प्रतिसाद दिला. त्यामुळे भंडागे यांचे सुमारे 3000 किलो द्राक्ष एका दिवसात विकले गेले. ना व्यापारी, ना मध्ये दलाल व ना इतर कर त्यामुळे थेट द्राक्ष विकून त्याचा ग्राहकांनीही फायदा होत आहे. त्यामुळे या अभिनल उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.