अवश्य वाचा


  • Share

दोन जीपच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

संगमनेर (प्रतिनिधी) कोल्हार घोटी राज्यमार्गावरील कोकणेवाडी झाप येथे काळी पिवळी जीप व बोलेरो जीप यांच्या विचीत्र अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मात्र अपघातानंतर या दोन्ही घटनास्थळावरून पसार झाल्या. सागर भरत आहेर (वय 23) रा. पिंपळगाव कोंझिरा असे या अपघत्ततात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. कोल्हार घोटी मार्गावर संगमनेर अकोले अशी प्रवासी वाहतुक करणारी काळीपिवळी जीप व एक बोलेरो यांच्यात धडक झाली. मात्र या धडकेत दोन्ही गाड्यांच्यामध्ये सागर आहेर हा सापडला गेला. व त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. परिसरातील नागरीकांनी त्याला उपचारासाठी तात्काळ येथील तांबे रूग्णालयात दाखल केले मात्र अतीरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. या बाबात तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.