Saturday, June 5, 2021

मे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशावेळी गरीब, स्थलांतरित लोकांच्या आर्थिक अडचणींचा प्रश्न उभा राहतो. देशातील कोरोनाच्या उद्रेकामुळे गरीब आणि गरजू लोकांना होणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरं जाण्यासाठी भारत सरकारने मे आणि जून महिन्यासाठी सुमारे 5 किलो प्रति व्यक्ती धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा देशातील 80 कोटी लोकांना होणार आहे.  

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत आधीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या धर्तीवर हे अन्नधान्य पुढील दोन महिन्यांसाठी अर्थात मे आणि जून 2021 साठी वाटप करण्यात येणार आहे.
या विशेष योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गृहकर्मी या दोन्ही प्रवर्गांतर्गत सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यात येईल.  दरमहा प्रति व्यक्ती 5 किलोच्या प्रमाणात अन्नधान्य अनुदानावर आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी राज्ये  आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय सहाय्य करण्यासाठी 26 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च भारत सरकार करेल.

देशातील कोविड-19 च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांच्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील दोन महिने अर्थात मे आणि जून 2021 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत समावेश असणाऱ्या सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कोरोना नियम पाळा – घरपट्टी टाळा ; मंगळापूरच्या सरपंच व उपसरपंचाचे कोरोनामुक्तीसाठी प्रभावी पाऊल

संगमनेर (प्रतिनिधी)मागील काही दिवसामध्ये संगमनेर तालुक्यात कोरोना बाधीताच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत होती. ग्रामीण भागातील 16 हजार...

ट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा

वारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...

माझी वसुंधरा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे घवघवीत यश ; नगरपंचायत गटात शिर्डी राज्यात सर्वप्रथम तर कर्जत द्वितीय : मिरजगाव, लोणी बु. ग्रामपंचायत गौरव ; तर...

अहमदनगर: राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात सन २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या...

…तर जागतिक प्रदुषण दूर होण्यास वेळ लागणार नाही – प्राचार्य अरुण गायकवाड ; संगमनेर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा

संगमनेरः वसुंधरेच्या पर्यावरणाची सुरक्षितता व प्रदुषरहीत वातावरण ठेवण्यास सर्व तरुणांनी सहभागी होणे आवश्यक आहे. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,...

रुग्णांना दिलासा : खासगी रुग्णालयातील कोरोना उपचारासाठी दर निश्चित ; जाणून घ्या कोणत्या शहरात किती शुल्क लागणार

मुंबई - खाजगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार आणि उर्वरित...